अकोला : शहरातील कौलखेड परिसरात पतंग महोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरण तसेच पशुपक्ष्यांसाठी घातक चायनीज मांजा व प्लास्टिक पतंगमुक्त पतंगोत्सव साजरा करण्याबाबत युवकांना संदेश देऊन पतंगोत्सवाचा आगळावेगळा आदर्श निर्माण करण्यात आला. यावेळी विजेत्या स्पर्धकांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
या वेळी राज्य शासनाने आखून दिलेल्या करोनासंबंधित सर्व नियम व अटी पाळून मकरसंक्रांतीच्या पर्वावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महानगराध्यक्ष करण दोड यांनी पतंग महोत्सवाची यशस्वी संकल्पना साकारली. दरम्यान, विजयी स्पर्धकांसाठी माजी नगरसेवक पंकज गावंडे यांच्यावतीने ५००१ रुपयांचे प्रथम बक्षीस तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ मोहोड यांच्यावतीने ३००१ रुपयांचे द्वितीय बक्षीस ठेवण्यात आले होते. या पतंगोत्सव स्पर्धेत प्रथम बक्षीस मंथन मस्के यांनी पटकावले, तर द्वितीय बक्षीस अजिंक्य मुंडे यांनी पटकावले. तसेच यावेळी प्रमुख उपस्थिती गणेशभाऊ राऊत, विशाल गावंडे, किशोर राजूरकर, पिंटू शिंदे, शाम कोहर, जयंत कडू, रवी अंभोरे, मुन्ना पावसाळे आदी उपस्थित होते.
मनसेने वाटल्या पतंग
अकोला : अकोट फैलमधील प्रभाग नं २ मधील अशोकनगर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मकरसंक्रांतीनिमित्त लहान मुलांना सहाशे पतंगांचे वाटप करण्यात आले. यावेळी मनसेचे जिल्हा अध्यक्ष पंकज साबळे, राकेश शर्मा, चंदू अग्रवाल, सागर शंभरकर, आकाश वानखळे, संतोष अग्रवाल, संतोष पवार, आनंद चवरे, सुनील वाघमारे, रोहित बोरकर, संगीता अढागळे, जया पवार, कलावती मानवटकर, नंदा अढागळे, गणेश बोबाटे, बंटी,पवार आदी उपस्थित होते.
राष्ट्रमाता संंस्थेच्यावतीने जिजाऊंना वंदन
अकाेला : राष्ट्रमाता जिजाऊ बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने जिजाऊंना अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्था अध्यक्ष सचिन गावंडे, जनकल्याण समिती अध्यक्ष डाॅ. एम. जी. वाडेकर, बेबी गावंडे, उज्ज्वल खंडारे, ललिता खंडारे, चंद्रकला सदाशीव आदी उपस्थित होते.