अकोला: सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने करोना संकटात सामाजिक अंतर राखीत स्थानीय शिवाजी पार्क येथे शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शिवजयंती समिती अध्यक्ष अविनाश देशमुख यांच्या अध्यक्षतेत संपन्न या जयंती सोहळ्यत प्रमुख अतिथी म्हणून डॉ.अभय पाटील, कृष्ण अंधारे,डॉ दीपक मोरे,डॉ हर्षवर्धन मालोकर,डॉ.गजानन नारे,विनायकराव पवार,डॉ.रामेश्वर भिसे,इंदूताई देशमुख,जयश्री ठाकरे,मंगेश काळे,सरफराज खान,प्रदीप खाडे, राजाभाऊ देशमुख,जावेद जकरिया,राम मुळे,समिती कार्याध्यक्ष पवन महल्ले,सचिव चंद्रकांत झटाले,पंकज जायले आदी उपस्थित होते.यावेळी मान्यवरांनी शिवप्रतिमेस हारार्पण करून जयंती सोहळ्यास प्रारंभ केला.कार्यक्रमात शिवसप्तहात घेतलेल्या कार्यक्रम व स्पर्धांचे पारितोषिक वितरण करण्यात आले.
सकाळी शिवाजी महाराज पार्क येथे शिवजन्मोत्सव संपन्न झाला.यावेळी सजविलेल्या पाळण्यात तान्ह्या शिवाजीचा देखावा साकार करून उत्सव साजरा करण्यात आला.यावेळी पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्र्वकृती पुतळ्यास हारार्पण करून त्यांना मानवंदना दिली.तर सहकार नगर येथील शिव पुतळ्यासमोर शिवमती यांचे व्याख्यान संपन्न झाले. दरम्यान शिवाजी महाराज पार्क परिसरात दिवसभर अनेक कार्यक्रमाची रेलचेल हाेती पोवाडे व शिवगीत स्पर्धेत अनेकांनी सहभाग घेत आपली कला सादर करून जल्लोष निर्माण केला.यात सौरभ वाघोडे,विनय बोरकर,सोहम बोरकर,शोभा वाकोडे,वेदांत गोतमारे,वेदश्री गोतमारे, अर्थव गावंडे,रत्नमाला थोरात,सुजन बळी यांनी पोवाडे व शिवकालीन कला सादर केली. परीक्षण जया पुणताबेकर,हर्षवर्धन मानकर,देवेंद्र देशमुख, भाग्यश्री झटाले यांनी केले.संचालन संकेत राव यांनी तर सत्र आभार ऋतुजा रणपिसे व अश्विनी शिंदे यांनी मानले.या नंतर प्रवीण हटकर यांनी लघु चित्रपट स्पर्धेची छटा सादर केली. शिवछत्रपतींचे विचार स्त्री साठी काय होते याची चित्रफीत दाखविण्यात आली.सांयकाळी पार्क परिसरात दीपोत्सव साजरा करण्यात आला.यात हजारो दिव्यांची आरास निर्माण करून शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले.जयंती सोहळ्याचे संचालन पूजा काळे अक्षय राऊत यांनी तर आभार चंद्रकांत झटाले यांनी मानले.
यावेळी समाजातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.