शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता कुठे तरी थांबलं पाहिजे, नव्या पिढीला...’’, शरद पवारांकडून राजकीय निवृत्तीचे संकेत?  
2
'बंटेंगे तो कटेंगे'... योगी आदित्यनाथ ठरणार निवडणुकीत 'ट्रम्प कार्ड', PM मोदींपेक्षा जास्त सभा घेणार!
3
कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवारांची कोंडी?; नाम साधर्म्य असलेल्या उमेदवाराला मिळाले ट्रम्पेट चिन्ह!
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : संजय वर्मा महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची नियुक्ती
5
रेल्वे स्टेशनवर सुटकेमध्ये मृतदेह, गुपचूप पळणाऱ्या बाप-लेकीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
सुनील तटकरे महायुतीशी गद्दारी करतायेत; शिंदे गटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
7
सेल्फीमुळे गेला जीव; राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या टेबल टेनिसपटूंचा तलावात बुडून मृत्यू
8
IPL 2025 Mega Auction: MI शिवाय या ४ फ्रँचायझी संघात सेट होऊ शकतो Arjun Tendulkar
9
“उमेदवारी यादी आधीच दिली, ते माघारीचे कारण नाही, मनोज जरांगेंवर दबाव...”: राजरत्न आंबेडकर
10
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
11
"...मग पंतप्रधान कशाला होता, मुख्यमंत्री व्हा"; बारामतीतून शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा
12
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
13
भारताच्या लाजिरवाण्या पराभवाने BCCI 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; गौतम गंभीरवर होणार प्रश्नांची सरबत्ती
14
UIDAI नं मोफत आधार कार्ड अपडेटची मुदत वाढवली, 'या' तारखेपर्यंत शुल्क लागणार नाही
15
IAS अधिकाऱ्याला मिठाईच्या बॉक्समधून लाच देणं नेत्याला पडलं महागात, पोलीस आले अन्....
16
सर्वोच्च न्यायालयाचा मदरशांना मोठा दिलासा, मदरसा कायदा घटनात्मक घोषित; हायकोर्टाचा निर्णय फिरला
17
दो भाई दोनों तबाही! शिखर धवन आणि युझवेंद्र चहलची भन्नाट कॉमेडी; चाहत्यांना हसू आवरेना
18
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
19
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
20
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत

मुलीवर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या नराधम बापास सश्रम कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 4:44 PM

अकोला - एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी एका १६ वर्षीय स्वत:च्या बालीकेवर अनैसर्गिक अत्याचार तसेच तीचा विनयभंग करणाऱ्या नराधम बापास प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश मोनीका आरलॅन्ड यांच्या न्यायालयाने बुधवारी पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

अकोला - एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी एका १६ वर्षीय स्वत:च्या बालीकेवर अनैसर्गिक अत्याचार तसेच तीचा विनयभंग करणाऱ्या नराधम बापास प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश मोनीका आरलॅन्ड यांच्या न्यायालयाने बुधवारी पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच आरोपीस तीन लाखांचा दंडही ठोठावण्यात आला असून दंड न भरल्यास आणखी शिक्षेची तरतुद न्यायालयाने केली आहे. या आरोपीस पत्नीच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने यापुर्वीच जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून ती शिक्षा तो भोगत आहे.एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी काशीराम तुळशिराम पानझडे याने त्याच्याच पोटच्या १६ वर्षीय बालीकेवर २८ आॅगस्ट २०१७ रोजी ही मुलगी झोपेत असतांना अनैसर्गिक अत्याचार केला, यासोबतच मुलीचा विनयभंग करीत अश्लील शिवीगाळ केली, झालेल्या प्रकाराची वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. एवढेच नव्हे त स्वताच्या मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची खळबळजनक तसेच हृदयद्रावक घटना घडली होती. या मुलीला बालकल्याण समितीसमोर आणल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी काशीराम पानझाडे या नराधमाविरुध्द ३५४, ३५४अ, ३७७, ३२३, २९४, ५०६ आणि पोक्सो कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास ठाणेदार कीशोर शेळके यांच्या मार्गदर्शनात केल्यानंतर पोलिसांनी दोषारोपपत्र जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश मोनीका आरलॅन्ड यांनी ७ साक्षीदार तपासल्यानंतर आरोपी नराधम काशीराम पानझाडेविरुध्द आढळलेल्या ठोस पुराव्यांच्या आधारे त्याला विविध कलमान्वये शिक्षा ठोठावली. या प्रकरणातील आरोपीस तब्बल ८ कलमांत शिक्षा ठोठावण्यात आली असून तीन लाख रुपये नुकसान भरपाई पिडितेला देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणामध्ये सरकारपक्षाकडून अ‍ॅड. मंगला पांडे व अ‍ॅड. राजेश आकोटकर यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAkolaअकोलाCourtन्यायालय