अकोला: बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील बेल्हाड येथील रहिवासी एका २६ वर्षीय युवकाने हरिहरपेठेतील २६ वर्षीय युवतीचे लग्नाचे आमिष देऊन लैंगिक शोषण केल्याची घटना गुरुवारी उजेडात आली. या प्रकरणी जुने शहर पोलिसांनी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली असून, त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस २१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.नांदुरा तालुक्यातील बेल्हाड येथील रहिवासी सोपान गजानन साबे या युवकाचे हरिहरपेठेतील एका युवतीसोबत प्रेमसंबंध आले. याच प्रेमातून त्याने युवतीला लग्नाचे आमिष दिले. त्यानंतर गत दोन वर्षांपासून लग्नाचे आमिष देऊन या युवतीचे विविध ठिकाणी लैंगिक शोषण केले. यामध्ये खामगाव शहरातील काही ठिकाणी तसेच हरिहरपेठेतील एका खोलीमध्ये या युवकाने युवतीला लग्नाचे आमिष देऊन तिचे लैंगिक शोषण केले. त्यानंतर युवतीने सोपान साबे याला लग्न करण्याची विनंती केली असता त्याने लग्न करण्यास टाळाटाळ केली; मात्र युवतीने लग्न क रण्यासाठी त्याचा पाठलाग करताच युवकाने युवतीची फसवणूक करीत लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे या युवतीने सदर युवकाविरुद्ध लैंगिक शोषणाची तक्रार जुने शहर पोलीस ठाण्यात दिली असून, पोलिसांनी सोपान साबे याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६ नुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. त्यानंतर आरोपीस गुरुवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस २१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.