पातूर : पातूर शहरात रॅपिड अँटीजन टेस्टच्या माध्यमातून नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. या टेस्टद्वारे सोमवारी आणखी १0 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. रविवारी ११ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. दोन दिवसांमध्ये २१ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. आता तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या ७0 वर पोहोचली आहे.आमदार नितीन देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी दुपारी तहसील कार्यालयात सर्वपक्षीय बैठक झाली. या बैठकीत पातुरात ७ ते १0 जुलैपर्यंत पातूर तालुक्यात जनता कर्फ्यू राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकील महसूल, पोलीस विभाग, पंचायत समिती, पातूर नगर परिषद, ग्रामपंचायत प्रशासनाचे सर्व अधिकारी उपस्थित होते. जनता कर्फ्यूदरम्यान पातुरातील मेडिकल, बँका सुरू राहतील. पातूर शहरातील कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे; मात्र नागरिक अनेक ठिकाणी गर्दी करताना दिसून येत आहेत. पुढील चार दिवस नागरिकांनी स्वत: घराबाहेर पडू नये. नागरिकांनी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार दीपक बाजड, गटविकास अधिकारी विनोद शिंदे, मुख्याधिकारी सोनाली यादव, तालुका वैद्यकीय अधिकारी विजय जाधव, सहायक पोलीस निरीक्षक जी. जी. बायसठाकूर, शिर्ला ग्रामविकास अधिकारी राहुल उंदरे आदींनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)