आकाेट फैल पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील माेमीनपुरा येथील रहिवासी एक आराेपी वल्लभनगर येथील रहिवासी एका महिलेला साेबत घेऊन अमरावती जिल्ह्यात सेक्स रॅकेट चालवीत असल्याची माहिती अमरावती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली़ यावरून अमरवती पाेलिसांनी संबंधित ठिकाणांवर छापेमारी करीत दाेघांनाही ताब्यात घेतले़ तर या गाैरखधंद्यात जबरदस्तीने लाेटलेल्या तीन युवतींची पाेलिसांनी सुटका केली़ अमरावती पाेलिसांनी या देहव्यापार अड्ड्यावर एक फंटर पाठवून माहितीची खातरजमा केली़ त्यानंतर दुसऱ्या एका व्यक्तीला ग्राहक म्हणून पाठवून या अड्ड्यावर छापा टाकण्यात आला़ अकाेट फैलातील माेमीनपुरा येथील रहिवासी ३५ वर्षीय आराेपीसह त्याची साथीदार महिला या दाेघांना ताब्यात घेण्यात आले़ तर तीन युवतींची सुटका पाेलिसांनी केली़ या देहव्यापार अड्ड्यावरून सुमारे एक लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ ही कारवाई अमरावती शहराच्या पाेलीस आयुक्त आरती सिंग यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली़
अकाेल्यातील आराेपी अमरावतीत चालवत हाेता सेक्स रॅकेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2021 4:08 AM