- संतोषकुमार गवईपातूर: अकोला-पातूर मार्गावर असलेल्या शिर्ला गावानजिक ‘बुद्धभूमी परिवेण’ हे बुद्धविहार व विपश्यना केंद्र भंते बी.संघपाल यांनी स्थापित केले आहे. परिसर निसर्गरम्य असल्याने परिसरात अनेक नवनवीन वन्यजीव दिसतात. त्यामुळे येथे निसर्गप्रेमींची मांदियाळी असते. दरम्यान, शनिवारी संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास दुर्मीळ असलेला माळढोक पक्षी निदर्शनास आला.माळढोक पक्षी हा भारत, पाकिस्तान अशा कोरड्या प्रांतामध्ये आढळणारा अत्यंत दुर्मीळ पक्षी आहे. या पक्ष्याच्या संरक्षणासाठी अनेक राज्य सरकारांनी ठोस पावले उचलली आहेत. याला ग्रेट इंडियन बस्टार्ड असेही म्हणतात. विदर्भात या पक्ष्याला ‘हुम’ असेही म्हणतात.मोठे, उभे शरीर, उंच पाय यामुळे हा पक्षी शहामृगासारखा दिसतो. उडणाऱ्या पक्ष्यांमधील सर्वांत जड पक्ष्यांपैकी हा एक आहे. भारतातील कोरड्या माळरानांवर एकेकाळी सहज दिसणाºया या पक्ष्यांची संख्या सन २०११ मध्ये केवळ २५० इतकी असल्याचा अंदाज करण्यात आला होता. २०१८ मध्ये ही संख्या १५० झाली होती. शिकार, अधिवासाच्या ºहासामुळे ही प्रजाती अतिशय संकटग्रस्त स्थितीत आहे. हा पक्षी सन १९७२ च्या वन्यजीव संरक्षण अधिनियमान्वये संकटग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आली आहे.हा दुर्मीळ पक्षी बुद्धभूमी शिर्ला परिसरात आढळल्याने निसर्गप्रेमी व हौशी पक्षीनिरीक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. या परिसरामध्ये वन विभागाने वृक्ष लागवड जंगलामध्ये परावर्तित व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे अकोला शहरासह लगतच्या तालुक्यातील पर्यटक मोठ्या प्रमाणात येत आहेत.