पातूर अकोला मेडशी दरम्यान निर्माणधीन महामार्गाला भंडारज जवळील श्री हनुमान मंदिराकडील बाजूस अवकाळी पावसामुळे रस्त्याच्या कडेने भूस्खलन झाल्याने प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे याबाबत जागृत नागरिकांनी कंपनीच्या कारभाराविराेधात राेष व्यक्त केला असून गुजरातच्या या कंपनीला अभय काेणाचे असा प्रश्न उपस्थित हाेत आहे
अकोला मेडशी दरम्यान गुजरातच्या एका कंपनीला महामार्गाचे चौपदरीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने 600 कोटी रुपये वरून अधिक रकमेचे कंत्राट मंजूर केले आहे सदर कंपनी रस्ता निर्माण करताना अतिशय घाईगर्दीने काम करीत असल्यामुळे केवळ आठ दिवसात तयार झालेला रस्तावर भंडारज फाट्या जवळील श्री हनुमान मंदिराच्या कडील बाजू भूस्खलन झाले असल्याचे येथील मंदिर पुजारी यांनी सांगितले
केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नामदार नितीन गडकरी यांच्या दिशा निर्देशानुसार अकोल्यापासून नांदेड पर्यंत म्हणजेच विदर्भ मराठवाडा जोडला जाणारा रस्ता मध्य प्रदेश ते आंध्र प्रदेश या राज्यांनाही ही जोडण्याचं काम करत आहे आहे
त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण भारत सरकार कार्यालय वाशिम यांनी सदर काम शासकीय परिमाणानुसार होणे अपेक्षित आहे हे मात्र हनुमान मंदिराजवळ सदर रस्त्याचं तीन ते चार ठिकाणी भूस्खलन झाल्याने रस्त्याच्या दर्जा संदर्भात नागरिकांनी प्रश्न उभे केले आहे सध्या गुजरातची मोंटे कार्लो कंपनी यांनी या कामाचे कंत्राट घेतले असल्याचे समजते सदर कंपनी ने शासकीय नियमांची पायमल्ली करत असल्याचे अनेक प्रकरणातून पुढे आले आहे नुकतेच अवैध मुरूम उत्खनन चा तारांकित प्रश्न विधान परिषदेतील आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी मांडला होता त्या अनुषंगाने महसूल विभागाने ऐंशी लाख रुपये पर्यंत दंड सदर कंपनीस ठोठावला आहे. त्याबरोबरच सातत्याने नागरिकांनी या कंपनीचा कार्यप्रणाली संबंधात
अनेक तक्रारी जिल्हाधिकारी तहसीलदार बाळापूर उपविभागीय अधिकारी यांच्याकडे केले आहेत. मात्र कंपनीच्या कामाकडे शासकीय यंत्रणा कमालीची डोळेझाक करीत असल्याचा आरोप नागरिकांना वेळोवेळी दिलेल्या निवेदनात केले आहे.
अकोला मेडशी दरम्यान महामार्गाचे चौपदरीकरण करण्यासाठी रस्त्याची इंग्रजकालीन मोठमोठी वृक्ष कत्तल सदर कंपनीने केली असली तरी तोडलेले ओंडके रस्त्याच्या दोन्ही ही बाजूस पडून असल्यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ झाल्याची माहिती लोकमतने यापूर्वीच प्रकाशित केली आहे. आता रस्ता भूस्खलनाचा नवा प्रश्न उभा राहिला आहे.