अकोला : यावर्षी केंद्र शासनाने हरभºयाला (चणा) प्रतिक्विंटल ४ हजार ८७५ रुपये हमीदर जाहीर केले;पण काढणीपूर्वीच बाजारात दर कोसळले असून, शासकीय खरेदी केंद्र अद्याप सुरू झाले नसल्याने शेतकऱ्यांना १ हजार ७५ रुपये या कमी दराने व्यापाºयांना हरभरा विकावा लागत आहे. यात उत्पादन खर्चही निघणे कठीण झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.या रब्बी हंगामात राज्यात २२.८९ लाख हेक्टरवर हरभरा पेरणी करण्यात आला आहे. तथापि, गतवर्षी पाऊस नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यापर्यंत पाऊस सुरू होता परिणामी पेरण्यांना उशीर झाल्याने उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे यापर्षी हरबºयाचा सरासरी उतारा ४ ते ५ क्विंटल आहे. विदर्भात रब्बी हंगामात बिगर सिंचनाचा हरभरा मोठ्या प्रमाणात घेतला जातो. यावर्षी अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती जिल्ह्यात ५ लाख १४ हजार ७७५ हेक्टर १२९ टक्के हरभºयाची पेरणी झाली. मागच्या वर्षीच्या तुलनेत हे क्षेत्र ९० हजार ८५५ हेक्टरने वाढले असले तरी यावर्षी शेतकºयांना प्रतिकूल परिस्थितीत हरभºयाची पेरणी करावी लागली. खरिपातील जवळपास सर्वच पिकांचे उत्पादन घटल्याने शेतकºयांची भिस्त हरभरा पिक ावर आहे. सद्यस्थितीत शेतकºयांना पैशांची नितांत गरज असल्याने हरभरा विक्रीची घाई सुरू आहे; पण काढणीच्या अगोदरच बााजरात दर कोसळले आहेत.अकोला कृषी उत्पन्न बाजारात आजमितीस सरासरी ३,५०० क्विंटल आवक सुरू आहे. सोमवारी ३,५७६ क्विंटल आवक होती. येथे प्रतिक्विंटल सरासरी दर ३,८०० रुपये दर आहेत;परंतु प्रतवारीच्या निकषानुसार व्यापारी हरभरा खरेदी करीत असून, हे दर प्रतिक्विंटल ३,५०० रुपये आहेत. चांगल्या वाळलेल्या पिवळ्या हरभºयाला ३,८५१ रुपये दर देण्यात आले. सद्यस्थितीत सर्वच डाळवर्गीय पिकांचे दर कमी झाले आहेत, तसेच डाळ गिरणी व बाजारातही हरभरा उपलब्ध असल्याने दर कमी आहेत.
शासकीय खरेदी केंद्राची प्रतीक्षाराज्यात सध्या हरभरा काढणीचा हंगाम सुरू आहे; पण शासकीय खरेदी केंद्रच सुरू झाले नसल्याने नाइलाजात्सव शेतकºयांना व्यापाºयांना १ हजार ७५ रुपये कमी दराने हरभरा विकावा लागत आहे. त्यामुळे खरेदी केंद्रे केव्हा सुरू होतात, याकडे शेतकºयांचे लक्ष लागले आहे.