- संजय खांडेकरअकोला : सरकी ढेपच्या दरात एक हजार रूपये प्रती क्विटंल ने वाढ झाली आहे. दीड महिन्यात ही भाववाढ झाली असल्याने पशुपालकांचे आर्थिक गणीत कोलमडले आहे. ही दरवाढ डब्बा सटोडियांनी केल्याचा आरोप होत आहे.वºहाडातील सरकी ढेपला देशपातळीवरील बाजारपेठेत जास्त मागणी असल्याने सटोडिये माल साठवून सरकी ढेपच्या भावात कृत्रिम वाढ करीत असतात. त्याचा जबर फटका देशभरातील पशुपालकांना सोसावा लागतो. दीड महिन्याआधी सरकी ढेपचे भाव २१०० ते २२०० रुपये क्विंटलच्या घरात होते; परंतु गेल्या पाच दिवसांपासून सरकी ढेपचे भाव ३१०० ते ३३०० रुपये क्विंटल दराच्या घरात पोहोचले आहे. त्यातही खामगाव येथील सरकी ढेपला जास्त मागणी असून, खामगावची ढेप ३५०० ते ३६०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचली आहे. अचानक दरवाढ झाल्याने आधीच हवालदिल असलेला शेतकरी पशुपालक कमालीचा हादरला आहे.तूर, हरभरा, चुरीचेही भाव वधारले!पशुखाद्य म्हणून वापरात येत असलेल्या तूर आणि हरभऱ्याच्या सालीच्या चुरीचे भावही गत दीड महिन्यापासून वधारले आहे. तूर सालीची चुरी दीड महिन्याआधी १४०० रुपये प्रतिक्विंटल होती. ती आता १९०० रुपये प्रतिक्विंटल झाली आहे. यासोबतच हरभरा साल चुरी दीड महिन्याआधी २१०० रुपये प्रतिक्विंटल होती, ती आता २५०० रुपये प्रतिक्विंटल दराने विकल्या जात आहे.
म्हणून वाढविले जाते सरकी ढेपचे भाववºहाडात कापसाचा पेरा जास्त असल्याने कापूस आणि त्यांच्या तेल बियांवर होणाºया जोड उद्योगांवर परिसरातील अर्थव्यवस्था अवलंबून आहे. त्यामुळे सूतगिरण्या, सरकी तेल, सरकी ढेप आणि सरकीच्या चोथ्यापासून साबणाची निर्मिती होते. यापैकी वºहाडातील सरकी ढेपला देशभरात मागणी आहे. दुधाळ जनावरांसाठी सरकी ढेप उपयुक्त ठरत असल्याने पशुपालक सरकी ढेपला प्राधान्य देतात. त्यामुळे बाजारपेठेत सरकी ढेपचे भाव कृत्रिमरीत्या वाढविल्या जातात.