शहरं
Join us  
Trending Stories
1
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
2
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
3
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
4
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
5
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर
6
देश सोडला, भारतात आली, ओळख लपवली...; एडल्ट स्टार बन्ना शेख कशी बनली रिया बर्डे?
7
'डॉली चायवाला'ची क्रेझ! भारताच्या हॉकी संघाकडे केलं दुर्लक्ष; खेळाडूंनी व्यक्त केली खदखद
8
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका
9
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
10
अत्याचारी राक्षस पुन्हा नको, यासाठी माझी लढाई; उमेश पाटील करणार NCP ला रामराम?
11
Musheer Khan Accident: टीम इंडियाचा क्रिकेटर सर्फराज खानचा भाऊ मुशीरचा अपघात
12
Solar Eclipse 2024: सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही पण परिणाम होतो हे नक्की; जाणून घ्या उपाय!
13
पितृपक्ष: चतुर्दशी श्राद्ध एवढे महत्त्वाचे का? केवळ ‘या’ पितरांचा करतात विधी; पाहा, मान्यता
14
काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी चकमक; 3 जवान जखमी, सर्च ऑपरेशन सुरू
15
Indira Ekadashi 2024: नोकरी व्यवसायात यशप्राप्तीसाठी आज इंदिरा एकादशीला करा 'हे' खास उपाय!
16
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
17
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
18
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
19
अदानींच्या झोळीत आली आणखी एक कंपनी; २०० कोटींना झाली डील, जाणून घ्या
20
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...

राष्ट्रसंतांचे विचार ऐकण्यापेक्षा कृतीत आणण्याची गरज

By admin | Published: January 30, 2017 3:33 AM

राज्यस्तरीय विचार साहित्य संमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमात जनार्दन बोथे यांचे प्रतिपादन.

अकोला, दि. २९- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समजणे फार कठीण आहे. अनेक वर्ष मी त्यांच्या सहवासात घालविली; परंतु अद्यापही महाराज मला पूर्ण कळलेले नाही. आजही मी त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. समाजामध्ये परिवर्तन घडविण्यासाठी आणि सुविचारी समाज निर्माण करण्यासाठी त्यांनी अनेक साहित्यरचना केल्या. भजने लिहिली आणि समाजजागृतीचे कार्य केले; परंतु अद्यापही समाज जागा झालेला नाही. त्यामुळे आम्हाला अधिक गतीने कार्य करण्याची गरज आहे. राष्ट्रसंतांचे विचार ऐकण्यासोबतच कृतीत आणण्याची गरज आहे. असे मत अ.भा. गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन बोथे यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समितीतर्फे स्वराज्य भवन प्रांगणातील ऋषिवर्य घुसरकर महाराज साहित्य नगरीमध्ये आयोजित चौथ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाचा समारोप करताना ते बोलत होते. विचारपीठावर माजी मंत्री गुलाबराव गावंडे, स्वागताध्यक्ष डॉ. अभय पाटील, डॉ. हर्षवर्धन मालोकार, डॉ. भास्करराव विघे गुरुजी, नीरज खोसला, प्राचार्य काळे, डॉ. रघुनाथ वाडेकर, अँड. रामसिंग राजपूत आदी होते. जनार्दन बोथे म्हणाले, गुरुदेव सेवा मंडळाचे कार्य सर्वदूर पसरविण्याची गरज आहे आणि या कार्यातून समाजाचे प्रबोधन करून एक सशक्त समाज निर्माण व्हायला हवा. त्यासाठी संकल्प करण्याची गरज आहे. सद्य परिस्थिती समाजासमोर अनेक आव्हाने उभी ठाकली आहेत. या आव्हानांचा सामना करण्यासाठी राष्ट्रसंतांचे विचार, त्यांचे साहित्यच समाजाला तारू शकते. एक बलशाली भारत निर्माण करण्याची ताकद राष्ट्रसंतांच्या विचारांमध्ये आहे, असेही जनार्दन बोथे यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमामध्ये ग्रामगीताचार्य पदवी मिळविणारे कर्डीकर गुरुजी, वंदन कोहाडे, सौ. मानकर, रामकृष्ण गावंडे, सौ. खडतळकर, भरत राऊत आणि उत्कृष्ट कार्य करणार्‍या श्रृती देशमुख, सोनाली शर्मा, संदीप देशमुख, पत्रकार शिवाजी भोसले, विवेक मेतकर यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन श्रीकृष्ण पखाले, गोपाल गाडगे यांनी केले. आभार प्रा. डॉ. राजीव बोरकर यांनी मानले. सामुदायिक प्रार्थनेने विचार साहित्य संमेलनाची सांगता झाली. संस्कार, संस्कृती जपण्याची गरज- गुलाबराव गावंडे- समाजामध्ये बीभत्स वातावरण निर्माण झाले आहे. टीव्ही, मोबाइलमुळे महिला, तरुणींच्या वर्तनात, राहणीमानात बदल झाला आहे. एकप्रकारे अंगप्रदर्शन करून प्रतिष्ठा घालविण्याचे काम होत आहे. आपले संस्कार, संस्कृतीचा विचार समाजाला विसर पडत चाललाय. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार, साहित्य समाजासाठी प्रेरक आहे. तरुण, तरुणींनी राष्ट्रसंतांच्या साहित्याचा अभ्यास करावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री गुलाबराव गावंडे यांनी विचार साहित्य संमेलनात बोलताना केले.