बुलडाणा: संगणकीकृत शिधापत्रिकांवर कुटुंबातील वरिष्ठ महिलेच्या नावे तसेच कुटुंबातील सर्व सदस्यांच्या आधार क्रमांकासह धान्य देण्याचा निर्णय शासनाने ११ मार्च २0१५ रोजी घेतला होता; मात्र प्रक्रिया राबविताना वर्ष लोटले तरी मे २0१६ अखेरपर्यंत केवळ ४ लाख ७६ हजार ८0२ शिधापत्रिकाधारकांचे प्रपत्र संकलित करण्यात आली आहेत. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार एनआयसी दिल्लीच्या कॉमन अँप्लिकेशन सॉफ्टवेअर (सीएएस) राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या संगणकीकरणाचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. दोन टप्प्यांमध्ये असणार्या या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात भारतीय अन्न महामंडळातून धान्य उचलून त्याचे शासकीय गोदामापर्यंतच्या वाहतुकीचे सनियंत्रण तसेच सर्व शिधा वाटप कार्यालयीन कामाचे संगणकीकरण व लाभार्थी कुटुंबाला संगणकीकृत शिधापत्रिका देणे याचा समावेश आहे.प्रत्येक कुटुंबांना या संगणकीकृत शिधापत्रिका देताना कुटुंबातील प्रत्येक सदस्यांचे आधार कार्ड क्रमांक शिधापत्रिकेसोबत जोडणी करण्याचे काम सुरू करण्यात आले. या प्रक्रियेत अमरावती विभागातील बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ या पाच जिल्ह्यातील २२ लाख ६७ हजार ६६४ शिधापत्रिकाधारक समाविष्ट करण्यात आले.ही प्रक्रिया सुरू असतानाचा दुसर्या टप्प्यातील स्वस्त धान्य दुकानांतील व्यवहाराचे संगणकाद्वारे व्यवस्थापन व बायोमेट्रिक नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यामुळे रेशनकार्डला आधार लिकिंगची गती संथ होऊन वर्षभरात केवळ ४ लाख ७६ हजार ८0२ प्रपत्र संकलित झाल्यामुळे अद्याप १७ लाख ९0 हजार ८६२ शिधापत्रिकाधारकांचे प्रपत्र बाकी आहेत. बायोमेट्रिक पद्धतीने रेशन वाटपास विलंबशिधापत्रिकाधारकांना संगणकीकृत शिधापत्रिका देण्यासाठी लाभार्थींचे आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक व मोबाइल क्रमांकासह अन्य माहिती प्रपत्राद्वारे संकलित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. बुलडाणा जिल्ह्यात दीड लाख प्रपत्र संकलित करण्यात आले आहेत. ह्यआधारकार्डह्ण लिंकची परिस्थिती पाहता संगणकीकृत शिधापत्रिका व बायोमेट्रिक पद्धतीने रेशनचे वाटप किमान सहा महिने तरी होणार नाही, अशी माहिती जिल्हा पुरवठा विभागाकडून प्राप्त झाली आहे.
रेशनकार्डला आधार लिंकिगची गती संथ!
By admin | Published: June 11, 2016 2:55 AM