अकोला : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील मुदत संपणाऱ्या पाच नगर परिषदांच्या प्रारुप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यात येणार आहे. सोमवार २३ ऑगस्टपासून प्रारुप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याची कार्यवाही सुरु करण्यात येणार आहे.
डिसेंबर २०२१ ते फेब्रुुवारी २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या नगरपरिषद व नगरपंचायतींच्या प्रारुप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगामार्फत २० ऑगस्ट रोजी राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. त्यानुसार येत्या जानेवारीमध्ये मुदत संपणाऱ्या जिल्हयातील अकोट, बाळापूर, मूर्तिजापूर, पातूर व तेल्हारा या पाच नगर परिषदांच्या प्रारुप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यात येणार आहे. २३ ऑगस्टपासून नगर परिषदांच्या प्रारुप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याची कार्यवाही सुरु होणार आहे. संबंधित नगर परिषदांच्या मुख्याधिकाऱ्यांमार्फत नगर परिषदांच्या प्रारुप प्रभाग रचनेचा आराखडा तयार करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील पाच नगर परिषदांच्या प्रारुप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याची कार्यवाही सुरु करण्याचे निर्देश २१ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत जिल्ह्यातील नगर परिषदांच्या मुख्याधिकाऱ्यांना देण्यात येणार आहेत.