अकोला : जिल्ह्यातील १ हजार ६ गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर कृषी निविष्ठा पोहोचविण्यासाठी १ हजार ८०० शेतकरी बचत गटाचे नियोजन करण्यात आले असून, त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशात टाळेबंदी घोषित करण्यात आली आहे; परंतु यातून कृषी क्षेत्राला वगळण्यात आले आहे. खरीप हंगाम तोंडावर आल्याने शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते, कीटकनाशकाची गरज भासणार आहे. कृषी निविष्ठा खरेदी करण्यासाठी शेतकºयांची कृषी निविष्ठा विक्रेता दुकानावर गर्दी होऊ नये याकरिता कृषी विभागाने घरपोच निविष्ठांसाठी आत्मा अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या १,८०० शेतकरी गटांमार्फत जिल्ह्यातील १,००६ गावांत या कृषी निविष्ठा पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शेतकºयांनी आपल्या सोयीच्या गटाकडे मागणी नोंदवल्यानुसार त्यांना निविष्ठा पोहोचविल्या जात आहे. जिल्ह्यात बियाणे पुरवठा व खते कीटकनाशकांचा गुणवत्तापूर्ण व योग्य किमतीत पुरवठा व्हावा यासाठी १८ गुण नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. नऊ भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. जिल्ह्यासाठी ८६ हजार ४०० मेट्रिक टन खतांची आवश्यकता असून, ८० हजार ८३० मेट्रिक टन आवंटन प्राप्त झाले आहे. जिल्ह्यात १ लाख ४४ हजार ६७० क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. यातील १ लाख २६ हजार २१४ क्विंटल साठा उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त १३ हजार ४७५ क्विंटल बियाणे शेतकºयांकडे उपलब्ध असल्याची नोंदही कृषी विभागाकडे आहे.