शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
2
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
3
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
4
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
5
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या
7
मासेमारी करणाऱ्या बोटीत सापडले पाच टन ड्रग्ज, तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई
8
स्टेजवर जाऊन बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज! दिलजीत दोसांझच्या पुणे कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल
9
अहिल्यानगरमध्ये भाजपच्या दोघांना, राष्ट्रवादीच्या एकाला मिळू शकते संधी; मंत्रिपदाचे सात दावेदार!
10
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
11
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
12
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
13
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
14
Adani Group shares: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
16
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
17
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
18
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
19
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
20
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी

ज्येष्ठ नेत्यांचे बंडाचे निशाण; जिल्हा अध्यक्षांनी दिला कारवाईचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2020 12:40 PM

एका माजी आमदाराने जिल्हा परिषदेच्या एका गटातील पक्षाच्या अधिकृत उमेदवाराऐवजी अपक्ष उमेदवाराच्या प्रचाराचा नारळ फोडल्याने पक्षांतर्गत वाद किती टोकाला गेला आहे, याचे उदाहरणही पुढे आले आहे.

अकोला : भारिप-बमसंच्या अधिकृत उमेदवारांऐवजी अपक्षांचा प्रचार करणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांच्या पक्षविरोधी कारवायांची गंभीर दखल घेतली जात आहे. त्यासाठी पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अधिकृत उमेदवारांचा प्रचार करावा, अशा सूचना पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, महिला आघाडी अध्यक्ष प्रभा सिरसाट यांनी पत्राद्वारे गुरुवारी दिल्या आहेत. एका माजी आमदाराने जिल्हा परिषदेच्या एका गटातील पक्षाच्या अधिकृत उमेदवाराऐवजी अपक्ष उमेदवाराच्या प्रचाराचा नारळ फोडल्याने पक्षांतर्गत वाद किती टोकाला गेला आहे, याचे उदाहरणही पुढे आले आहे.जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत इच्छुकांना भारिप-बमसंची उमेदवारी न मिळाल्याने नाराजी पसरली. त्यापैकी काहींनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. त्यांना आवरण्यासाठी पक्षाने त्रिसदस्यीय समितीकडे जबाबदारी दिली. समितीने अनेकांची मनधरणी केली. त्यापैकी काहींनी माघार घेतली, तर उगवा, बोरगाव मंजू, हातगाव व बाभूळगाव या गटांतील अपक्ष आहेत. त्या अपक्षांचा प्रचार काही ज्येष्ठ नेत्यांनी सुरू केला. हा प्रकार पक्षविरोधी आहे. त्यामुळे त्या ज्येष्ठ नेत्यांच्या कारवायांची दखल पक्ष स्तरावर घेण्यात आली आहे. त्याचवेळी कार्यकर्त्यांनीही इतरांच्या बंडखोरीला प्रोत्साहन न देता पक्षासोबत राहावे, अशा सूचनाही पत्रातून देण्यात आल्या.  

चार गटांतील उमेदवारांची धाकधूकजिल्हा परिषदेच्या चार गटांतील उमेदवारांना विजयापासून रोखण्यासाठी पक्षाच्या माजी आमदाराने कारवाया सुरू केल्याची चर्चा आहे. त्यामध्ये बाभूळगाव, चांदूर, घुसर, कुटासा या गटांत पक्षविरोधी कारवाया होऊ शकतात, त्याची दखलही घेण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी पत्रात म्हटले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाPoliticsराजकारणAkola ZPअकोला जिल्हा परिषद