याचबरोबर, अकोला जिल्ह्यात १३, बुलडाणा जिल्ह्यात ११ आणि वाशिम जिल्ह्यात ३१ ठिकाणी महावितरण महिला कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग नोंदवून अंगणवाडीसेविका, आशा कर्मचारी, महिला बचत गटांचे मेळावे आयोजित करून, त्यांना महावितरण कृषी धोरणाची माहिती देण्यात आली, बचत गटांना वीजबिल वसुलीतून मिळणाऱ्या उत्पन्नाबाबत माहिती देण्यात आली, तसेच महिला असलेल्या शेतकरी ग्राहकांनी महावितरणच्या या संधीचा लाभ घेण्याबाबत सांगण्यात आले.
थकबाकीशुन्य झालेल्या परिमंडलातील ३४ महिला शेतकऱ्यांमध्ये अकोला जिल्ह्यातील १७, बुलडाणा १२ आणि वाशीम जिल्ह्यातील ५ महिला शेतकऱ्यांचा समावेश आहे. यासोबतच अकोला जिल्ह्यातील १० आणि बुलडाणा जिल्ह्यातील ०६ महिला ग्राहकांना महिला दिनाच्या पर्वावर प्राधान्याने नवीन कृषिपंप वीज जोडणी देऊन सन्मानित करण्यात आले, तसेच महिला दिनाच्या पर्वावर थकबाकी वसूल करणाऱ्या परिमंडलातील ४३ महिला जनमित्र व ऊर्जामित्रांनाही गौरविण्यात आले.