शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

‘त्या’ जागेवर धार्मिक स्थळाची पुन्हा उभारणी

By admin | Published: June 18, 2017 2:10 AM

सिटी कोतवालीसमोरील प्रकार; स्थळ निरीक्षणाचे निर्देश.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शासनाच्या जागेवर अतिक्रमण करून उभारण्यात आलेल्या धार्मिक स्थळावर महापालिका प्रशासनाने कारवाई केल्यानंतर पुन्हा त्याच जागेवर नव्याने धार्मिक स्थळाची उभारणी केली जात असल्याचा प्रकार सिटी कोतवालीसमोर उजेडात आला आहे. या प्रकरणाची महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी गंभीर दखल घेतली असून, संबंधित क्षेत्रीय अधिकार्‍यांना स्थळ निरीक्षणाचे निर्देश दिले आहेत. शहरात अनेक पुरातन धार्मिक स्थळे आहेत. गत दहा वर्षांंमध्ये जागा दिसेल, त्या ठिकाणी धार्मिक स्थळांची उभारणी करण्याचा नागरिकांनी सपाटा लावल्याचे दिसून येते. शासकीय जागा, मुख्य रस्ते व गल्लीबोळात पूज्य व्यक्ती-संतांच्या प्रतिमा व पुतळे उभारले आहेत. रात्री-अपरात्री अशा धार्मिक स्थळांची कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याने अनेकदा अप्रिय घटना घडल्या आहेत. त्यामुळे सामाजिक वातावरण दूषित होण्याचे प्रकारही वाढले आहेत. या सर्व बाबी लक्षात घेता, सर्वोच्च न्यायालयाने धार्मिक स्थळे हटविण्याचे आदेश दिले. त्यानुसार मनपा आयुक्त अजय लहाने यांनी धार्मिक स्थळांच्या नोंदी घेत पहिल्या टप्प्यात २00९ नंतर उभारलेली ५६ स्थळे हटविण्याची कारवाई केली. त्यानंतर २00९ पूर्वी उभारलेल्या; परंतु रस्त्यांलगत असलेल्या २२२ धार्मिक स्थळांवर कारवाई केली जात आहे. यामध्ये सिटी कोतवालीसमोरील लोखंडी पुलाजवळ असलेल्या दोन धार्मिक स्थळांना हटविण्याची कारवाई महिनाभरापूर्वी पार पडली होती. क्षेत्रीय अधिकारी जी.एम. पांडे यांच्या उपस्थितीत नगररचना विभाग, अतिक्रमण विभागातील कर्मचार्‍यांनी धार्मिक स्थळ हटविले. त्यावेळी सिटी कोतवालीचे ठाणेदार अनिल जुमळे जातीने उपस्थित होते. दोन धार्मिक स्थळांपैकी एक धार्मिक स्थळ स्वत:हून हटविणार असल्याची विनंती काही नागरिकांनी केल्यामुळे त्यांना एक दिवसाचा अवधी देण्यात आला होता. त्यानंतर या धार्मिक स्थळाकडे मनपाने फिरकूनही पाहिले नाही. त्याचे परिणाम समोर आले असून, मागील काही दिवसांपासून या ठिकाणी नव्याने धार्मिक स्थळाची उभारणी केली जात आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत मनपा आयुक्त अजय लहाने यांनी क्षेत्रीय अधिकार्‍यांना स्थळ निरीक्षणाचे निर्देश दिले आहेत. लोखंडी पुलाजवळून मोठा नाला वाहतो. नाल्याच्या जागेत अतिक्रमण करून दोन धार्मिक स्थळांची उभारणी करण्यात आली होती. या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होणे अपेक्षित नाही. अतिक्रमण हटविण्यासोबतच संबंधितांविरुद्ध फौजदारी तक्रार केली जाईल. -अजय लहाने, आयुक्त मनपा.