- राजरत्न सिरसाट
अकोला: वाढत्या कमाल तापमानानेअकोला होरपळत असून, रविवार, २८ एप्रिल रोजी विक्रमी नोंद करीत अकोल्याचे कमाल तापमान ४७.२ अंशावर पोहोचले. मागील १०० वर्षात एप्रिल महिन्यात एवढे तापमान कधीच नव्हते. असे रेकार्डच नसल्याची माहिती नागपूर हवामानशास्त्र विभागाने दिली. दरम्यान, उष्णतेची लाट जिल्ह्यात कायम असून, ३० एप्रिलपर्यंत राहणार असल्याचा इशारा हवामानशास्त्र विभागाले दिला. सोमवार, २९ एप्रिल रोजी ४६.९ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. मागील सहा दिवसांपासून अकोल्याचा पारा सतत वाढतच असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.१९ मे २०१६ रोजी ४७.१ अंश तापमान होते. २० व २१ आणि २२ मे २०१० मध्ये एवढेच तापमान होते तर २२ मे १९४७ रोजी ४७.८ अंश तापमानाची नोंद नागपूर हवामान शास्त्र केंद्राव्दारे करण्यात आली होती. ३० एप्रिल २००९ मध्ये ४७.० कमाल तापमानाची नोंद हवामान शास्त्र विभागाकडे आहे; परंतु एप्रिल महिन्यात ४७.२ तापमानाची नोंद मागील पन्नास वर्षात नाहीच, शंभर वर्षाचे रेकार्ड उपलब्ध नाही. दरम्यान,मागील आठवड्यापासून उन्हाची ही तीव्रता प्रचंड वाढल्याने बाहेर पडणे कठीण झाले. बाहेर पडले तर उन्हाचा सामना करणे नकोसे झाले आहे. अंगातून वाहणाऱ्या घामाच्या धारांनी अशक्तपणा जाणवू लागला. उष्माघाताने मृत्यूचे प्रमाण वाढले असून, या आठवड्यात अकोला जिल्ह्यात तीन जणांचा बळी घेतला. शासकीय,खासगी रू ग्णालयात उष्माघाताचया रू ग्णांत वाढ झाली. उष्म्याने दिवसभर घशाला कोरड पडत नागरिक हैराण झाले. पोटासाठी काम करणाºया कामगारांना उत्साह टिकवून ठेवणेही कठीण झाले. दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या खूपच कमी झाली असून, दुपारी रस्ते निर्मनुष्य असतात. सायंकाळी ७ वाजतापर्यंत उन्ह असले तरी रात्री उशिरापर्यंत उष्ण हवा वाहत आहे. दरम्यान, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी विद्या विभागाकडे ३० एप्रिल २००९ रोजी ४७.२ अंश तापमान असल्याची नोंद केल्याचे या केंद्राच्या तज्ज्ञांनी सांगितले.
३० एप्रिल २००९ मध्ये अकोल्याचे कमाल तापमान ४७.० अंश होते; पण ४७.२ अंशाचा आकडा मागील पन्नास वर्षात तरी नाही. १९४७ मध्ये ४७.८ अंश तापमान होते, अकोला जिल्ह्यात आणखी एक-दोन दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे.- डॉ. रवींद्र आकरे,हवामान शास्त्रज्ञ,प्रादेशिक हवामान शास्त्र केंद्र,नागपूर.