अकोला : अकोल्यातील रहिवासी प्रदीप नंद यांनी चिखलदरा या पर्यटण स्थळी साकारलेल्या २५४४ गणपती मूर्ती संग्राहलयाची नोंद ‘इंडिया बूक ऑफ रेकॉर्डस’ने घेतली आहे.अकोला येथे मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत प्रदीप नंद यांनी याबाबत माहिती दिली. गणपतीच्या विविध आकारतील मूर्तीचे सर्वाधिक संग्राहल केल्याबद्दल त्यांच्या संग्राहलाची नोंद घेण्यात आली आहे. नागपूर येथील डॉ. सुनीत धोटे यांनी संग्रहालयाची पाहणी करून त्यातील बारकाव्यांची नोंद घेतली. देशातीलच नव्हे तर विदेशातून आणलेल्या मूर्ती या संग्राहलायत बघावयास मिळतात. प्रदीप नंद व त्यांच्या पत्नी दिपाली नंद यांनी गेले ३० वर्षांपासून गणेश मूर्तीचा संग्रह केला आहे. देशातील गणेश मूर्तीचा हा आगळावेळगा संग्रह ठरला आहे. या पत्रकार परिषदेला संग्राहलायचे व्यवस्थापक डॉ. माधव देशमुख आणि इंद्रायणी देशमुख यांची उपस्थिती होती.
गणपती मूर्ती संग्राहलायाची ‘इंडिया बुका’त नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2022 5:42 PM