अकोला: शहराच्या कानाकोपऱ्यातील लघू व्यावसायिक, फेरीवाल्यांकडून नियमित हप्ता वसूल करणाºया अतिक्रमण विभागातील भ्रष्ट प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांमुळे महापालिकेची प्रतिमा मलिन झाली आहे. शहरातील व्यावसायिकांजवळून दररोज किमान दोन ते अडीच लाख रुपयांची वसुली करणाºया या विभागाचे शुद्धीकरण करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. या विभागाचे कारनामे लक्षात घेता गुरुवारी मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी संबंधित कर्मचाºयांची झाडाझडती घेऊन त्यांची चांगलीच कानउघाडणी केल्याची माहिती आहे.महापालिकेचा अत्यंत महत्त्वाचा विभाग असलेल्या अतिक्रमण विभागात मानसेवी व कंत्राटी कर्मचाºयांचा भरणा आहे. त्यांच्यावर जबाबदारी निश्चित होत नसल्यामुळे सराईत गुन्हेगाराप्रमाणे शहरातील लघू व्यावसायिकांजवळून सर्रासपणे हप्ता वसुली केली जात असल्याची माहिती आहे. पैसे न देणाºया व्यावसायिकांच्या हातगाड्यांची तोडफोड करणे, साहित्याची नासधूस करण्यासारखे प्रकार होत आहेत. आयुक्तांच्या आदेशानुसार अशा प्रकारच्या कारवाया कराव्या लागतात, अशी पुष्टी जोडली जाते. ही निश्चितच गंभीर बाब असून, घाम गाळून कष्टातून व्यवसाय थाटणाºया लघू व्यावसायिकांची या विभागाकडून आर्थिक लूट केली जात असल्याची माहिती आहे. हा प्रकार कमी म्हणून की काय, ठरावीक भागातील व्यावसायिकांनाच वारंवार ‘टार्गेट’ केल्या जाते. दादागिरीने रस्त्यावर व्यवसाय उभारणाºया खुले नाट्यगृह ते काश्मीर लॉज, मोहम्मद अली रोड, गांधी चौक, जुना किराणा मार्केटमधील व्यावसायिकांवर कारवाईच होत नसल्याची परिस्थिती आहे.खाबुगिरी करणाºया कर्मचाºयांना घरी पाठवा!अतिक्रमण विभागाच्या नावाखाली या विभागातील काही कर्मचारी दररोज सायंकाळी भाजी बाजारातून भाजी, फळांसह विविध साहित्य घरी घेऊन जातात. या विभागातील काही बहाद्दरांनी लघू व्यावसायिकांना व्याजाने पैसे दिले आहेत. त्यांच्याकडून नियमित व्याज वसूल करण्याच्या मोबदल्यात त्यांना जागा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती आहे. अशा कर्मचाºयांना सेवेतून कमी करून घरी पाठविण्याची मागणी होत आहे.आयुक्तांच्या भूमिकेकडे लक्षअतिक्रमण विभागातील भ्रष्ट प्रवृत्तीच्या कर्मचाºयांमुळे शहरात अतिक्रमण फोफावल्याचे चित्र आहे. याप्रकरणी गुरुवारी आयुक्त संजय कापडणीस यांनी सायंकाळी या विभागातील सर्व कर्मचाºयांची कानउघाडणी केली असून, ते काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.