शहरं
Join us  
Trending Stories
1
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
2
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
3
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
4
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
5
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
6
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
7
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
8
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
9
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
10
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
11
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
12
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
13
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
14
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
15
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
16
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
17
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
18
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
19
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
20
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 

एसआरपीएफ, बॅड्समन, कारागृहसोबतच पोलिस दलाची भरती एकाच दिवशी!

By नितिन गव्हाळे | Published: June 17, 2024 10:46 PM

शेकडो विद्यार्थ्यांचे खासदार धोत्रेंना निवेदन, उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या कानावर घातली समस्या

अकोला : एसआरपीएफ, बॅड्समन, कारागृह पोलिस आणि पोलिस दलाची भरती एकाच दिवशी आणि एकाच तारखेला होत असल्याने विद्यार्थ्यांना काही भरतीच्या प्रवेशाला मुकावे लागणार आहे. त्यामुळे या वेगवेगळ्या विभागांच्या भरतीची तारीख बदलण्याची मागणी विद्यार्थ्यांनी खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर यांच्याकडे १६ जून रोजी एका निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी खासदार धोत्रे, आमदार सावरकर यांनी राज्याच्या पोलिस महासंचालकांसोबत मोबाइलवर संपर्क साधून चर्चा केली आणि विद्यार्थ्यांच्या व्यथा मांडल्या.

वेगवेगळ्या विभागाच्या पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना १४ जून रोजी महाराष्ट्र पोलिस भरतीचे मैदानी चाचणी प्रवेश पत्र उपलब्ध झाले आहे; परंतु याचदरम्यान जिल्हा पोलिस, चालक पोलिस, राज्य राखीव पोलिस बल, बॅड्समन व कारागृह पोलिस या सर्व घटकांची मैदानी चाचणी एकाच वेळेस सुरू होत असल्याने उमेदवारांना एकाच दिवशी सर्व ठिकाणी उपस्थित राहता येत नसल्याने त्यांचे नुकसान होणार आहे. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जायला पूर्ण एक दिवसाचा कालावधी हा प्रवासात जाणार असल्याने मैदानी चाचणींच्या तारखा बदलण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, पोलिस महासंचालक तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी थेट संपर्क साधून विद्यार्थ्यांच्या व्यथा व समस्या आमदार रणधीर सावरकर व खासदार अनुप धोत्रे यांनी मांडल्या व त्यासंदर्भात विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी केली.

वेगवेगळ्या विभागांतील जागांसाठी भरले अर्जविद्यार्थ्यांनी दोन ठिकाणी फॉर्म भरल्यामुळे एका दिवशी परीक्षा होत असल्याने अडचणीचे ठरणार आहे. या संदर्भात खासदार धोत्रे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा करून मंगळवारी यासंदर्भात परीक्षा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या दिवशी घेण्याचे निर्देश देण्यात येतील, असे अभिवचन दिले आहे. 

टॅग्स :Policeपोलिस