अकोला : जिल्ह्यात गृहरक्षक दलाच्या जवानांसाठी २२५ रिक्त जागा असून, यासाठी बुधवारपासून भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, यासाठी अर्ज आलेल्या १ हजार ८०० युवकांची बुधवार आणि गुरुवार या दोन दिवसांत शारीरिक व दस्तऐवजांची तपासणी करण्यात आली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्याकडून ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, आक्षेप येऊ नये म्हणून या भरती प्रक्रियेचे छायाचित्रण करण्यात येणार आहे.जिल्हा पोलीस प्रशासनातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे तसेच बंदोबस्तात अहोरात्र झटणाºया गृहरक्षक दलातील जवानांचे अकोल्यात तब्बल २२५ पदे रिक्त होती. या रिक्त पदांसाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांनी पुढाकार घेऊन भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय वरिष्ठांच्या मार्गदर्शनात घेतला. बुधवार आणि गुरुवारी पोलीस मुख्यालयातील मैदानावर तब्बल १ हजार ८०० युवकांची तपासणी करण्यात आली आहे. शारीरिक तपासणी आणि दस्तऐवजांच्या आधारे या युवकांना गृहरक्षक दलात नियुक्तीचे पत्र देण्यात येणार आहे. यासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांनी १ हजार ८०० युवकांचे दस्तऐवज तपासणी आणि शारीरिक तपासणीच्या अहवालाचा अभ्यास सुरू केला असून, त्यांना लवकरच नियुक्तीचे पत्र देण्यात येणार आहे.
गृहरक्षक दलाच्या जवानांच्या रिक्त पदांसाठी दोन दिवस भरती प्रक्रिया राबविण्यात आली असून, ही प्रक्रिया आटोपली आहे. संपूर्ण भरती प्रक्रियेचे छायाचित्रण करण्यात आले आहे. नोकरीचे आमिष देणाºया दलाल किंवा अशा व्यक्तींपासून सावध राहावे, या भरती प्रक्रियेचा निकाल लवकरच लावण्यात येणार आहे.विक्रांत देशमुख,अतिरिक्त पोलीस अधीक्षक , अकोला.