शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
4
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
5
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
6
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
7
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
8
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
9
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
10
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
11
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
12
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
13
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
14
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
15
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
16
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
17
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
18
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
19
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
20
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

मनपाची करवाढ एक महिन्यात कमी करू - पालकमंत्र्यांचे आश्वासन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 12:33 PM

अकोला: महापालिकेने आकारलेल्या सुधारित करवाढीच्या संदर्भात प्रशासनासोबत सविस्तर चर्चा करून एक महिन्यात करवाढ कमी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन नगरविकास राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिले.

अकोला: महापालिकेने आकारलेल्या सुधारित करवाढीच्या संदर्भात प्रशासनासोबत सविस्तर चर्चा करून एक महिन्यात करवाढ कमी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन नगरविकास राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिले. पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर भारिप-बहुजन महासंघाने अन्नत्याग आंदोलन मागे घेतले.मनपा प्रशासनाने सत्ताधारी भाजपाच्या मदतीने अकोलेकरांवर अवाजवी करवाढ लादली असून, ती कमी करण्याची मागणी मनपातील भारिप-बमसंने लावून धरली आहे. पक्षाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली करवाढीच्या मुद्यावर आंदोलन छेडत शासनाकडे तक्रारी केल्या आहेत. मनपातील आर्थिक अनियमितता व शासन निधीच्या दुरुपयोगाची शासनाने चौकशी करण्याची मागणी करीत भारिप-बमसंच्या नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या मार्गदर्शनात २६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता मनपातील गटनेत्या अ‍ॅड. धनश्री देव, नगरसेविका किरण बोराखडे, महानगर अध्यक्ष वंदना वासनिक यांच्यासह अनेक पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी जठारपेठ चौकात अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सायंकाळी प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्यासोबत चर्चा करून भारिप-बमसंने उपस्थित केलेल्या करवाढीसह इतर मागण्यांवर योग्य निर्णय घेणार असल्याचे सांगितले. त्यावेळी डॉ. पाटील, प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या हस्ते ज्युस घेतल्यानंतर उपोषणकर्त्यांनी अन्नत्याग आंदोलन मागे घेतले. त्यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, नगरसेवक बबलू जगताप, प्रवक्ता डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, महिला जिल्हाध्यक्ष प्रभा शिरसाट, महासचिव ज्ञानेश्वर सुलताने, माजी जि.प. अध्यक्ष बालमुकुंद भिरड, पुष्पा इंगळे, शंकरराव इंगळे, सीमांत तायडे, दीपक गवई, शोभा शेळके, जिल्हा प्रसिद्धिप्रमुख डॉ. प्रसन्नजित गवई, सुवर्णा जाधव, बुद्धरत्न इंगोले, किरण पळसपगार, मनोहर पंजवाणी, अमोल सिरसाट, अ‍ॅड. संतोष राहाटे, पराग गवई, आशिष मांगुळकर, जय तायडे, सचिन शिराळे, सुनील इंगळे, सुनील पाटील, संदेश तायडे, किशोर वानखडे, प्रतिभा अवचार, राजू दहातोंडे, शेख सलीम, शेख खुदबी यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. 

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Ranjit patilडॉ. रणजित पाटीलBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघ