लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मांसाहारातून कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे संदेश सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाल्यानंतर बहुतांश लोक मांसाहाराला नकार देत आहेत. त्याचा फटका मांस विक्री बाजारपेठेला बसला आहे.चीनमध्ये कोरोना व्हायरसने हाहाकार माजविल्यानंतर जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. हीच स्थिती भारतातही असून, सोशल मीडियावरील संदेशांमुळे अनेक गैरसमज पसरले आहेत. विशेषत: मांसाहाराविषयी विशेष सतर्कतेबाबत सांगण्यात येत असल्याने बहुतांश लोक मांसाहाराला नकार देत आहेत. मांसाहारासोबतच अंडे आणि सी फूडचे सेवनही लोक टाळत आहेत. त्याचा फटका पोल्ट्री उद्योगासह मांसाहार अन् सी फूड बाजारपेठेला बसत आहे. असे असले, तरी काही लोक ांकडून मांसाहाराचे सेवन केल्या जात आहे; मात्र याविषयी अनेकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे, हे नक्की.वाढत्या तापमानामुळे ‘कोरोना’चा धोका कमीजास्त तापमानामध्ये कुठल्याही प्रकारचा व्हायरस जास्त काळ जिवंत राहू शकत नाही. देशभरात उन्हाळ्याला सुरुवात झाली असून, तापमान ३० डिग्रीच्यावर जात आहे. त्यामुळे मूळ भारतातील लोकांना कोरोनाचा धोका नसल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले.म्हणून मांसाहार ठरतेय धोकादायक !
- मांस विक्रेत्यांकडील अस्वच्छता.
- पोल्ट्री उद्योगात पाळल्या जाणाऱ्या प्राण्यांची योग्य निगा न राखणे.
- बहुतांश प्राण्यांना विविध आजारांचा संसर्ग असतो.
- उघड्यावर विक्री होणाºया मांसावर बसणारी धूळ अन् प्रदूषित धूर.
- अनेकदा खरेदी केलेले मांस शिळे असल्याने त्याचाही धोका.
कोरोना व्हायरसची लागण आणि मांसाहार याचा थेट संबंध नसला, तरी अप्रत्यक्ष मांसाहाराचा धोका संभवू शकतो. ज्या प्राण्यांची मांस विक्री केली जाते, त्या प्राण्यांना कशा पद्धतीने ठेवले जाते, त्या प्राण्यांना कुठल्या प्रकारचा संसर्ग आहे किंवा नाही, यावर सर्व गोष्टी अवलंबून असतात.- डॉ. मुकुंद अष्टपुत्रे, वैद्यकीय अधिकारी, जीएमसी, अकोला.