अकोला, दि. १४- नव्याने कार्यान्वित झालेल्या महावितरणच्या नागपूर येथील प्रादेशिक कार्यालयाचे संचालक प्रसाद रेशमे यांनी शुक्रवारी अकोला परिमंडळाचे मुख्यालय असलेल्या विद्युत भवन येथे परिमंडळातील तीनही मंडळांचा विभागवार आढावा घेतला. यावेळी त्यांनी अधिकार्यांशी संवाद साधून त्यांना सूचना केल्याची माहिती आहे.महावितरणचे मुख्य प्रशासकीय कार्यालय असलेल्या मुंबई येथील ह्यप्रकाशगडह्णचा भार कमी करण्यासाठी व वीजग्राहक तसेच कर्मचार्यांना सोयीचे व्हावे, यासाठी २ ऑक्टोबरपासून महावितरणची कल्याण, औरंगाबाद, पुणे व नागपूर येथे चार प्रादेशिक कार्यालये कार्यान्वित करण्यात आली. विदर्भाचे प्रादेशिक कार्यालय नागपूर येथे असून, या कार्यालयाचे प्रादेशिक संचालक प्रसाद रेशमे यांनी पदाचा कारभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या कार्यकक्षेतील परिमंडळांचा आढावा घेणे सुरू केले आहे. यानुषंगाने प्रसाद रेशमे यांनी शुक्रवारी अकोला परिमंडळाचे मुख्यालय असलेल्या विद्युत भवनला भेट देऊन परिमंडळातील तीनही मंडळांचा आढावा घेतला. विद्युत भवनमधील सभागृहात दिवसभर चाललेल्या बैठकीला मुख्य अभियंता किशोर मेश्राम, अधीक्षक अभियंता दिलीप दोडके यांच्यासह तीनही मंडळांतील कार्यकारी अभियंते, सर्व विभाग प्रमुख व इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रादेशिक संचालक रेशमे यांनी विभागनिहाय आढावा घेतला. ग्राहकांना तत्पर व अखंडित वीजसेवा मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. कृषी पंप, वीज जोडण्या, पायाभूत आराखडा, महावितरणच्या विविध योजना, थकबाकी व अभय योजना आदी विषयांवर त्यांनी अधिकार्यांसोबत चर्चा केली. शनिवारी ते अमरावती परिमंडळाचा आढावा घेणार असल्याची माहिती आहे. अनियमित मीटर रिडिंगच्या चौकशीचा आदेशशहरातील वीज ग्राहकांचे मीटर रिडिंग घेण्यात विलंब होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या अनियमिततेमुळे वीज ग्राहकांचा स्लॅब वाढून त्यांना नाहक भुर्दंंड सोसावा लागत आहे. याबाबत वाढत्या तक्रारींची दखल घेऊन े.या सर्व बाबींची सात दिवसांत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देशही प्रादेशिक संचालकांनी दिल्याची माहिती आहे.
प्रादेशिक संचालकांनी घेतला अकोला परिमंडळाचा आढावा
By admin | Published: October 15, 2016 3:18 AM