अकोला: येथील स्व. वसंत देसाई क्रीडांगणावर गुरुवारी विभागीय महसुल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा थाटात समारोप झाला. विभागीय आयुक्त पियुष सिंह यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमाला वाशिमच्या जिल्हा पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील प्रमुख पाहुण्या होत्या. यावेळी अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ. आर.बी. देशमुख वाशिमचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, अकोल्याचे पोलीस अधिक्षक एम राकेश कलासागर , महसुल विभागाचे उपआयुक्त गजेंद्र बावणे , आदींसह उपायुक्त स्तरांचे अधिकारी, पाचही जिल्हयातील महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होती.यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध व्यकतीगत व सांघिक खेळातील तसेच सांस्कृतिक स्पर्धेमधील विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले. महसुल विभागाचा या वर्षाचा सर्व साधारण क्रीडा चषक यवतमाळ जिल्हयाने पटकाविला. सांस्कृतिक स्पर्धेत अकोला जिल्हयाचा प्रथम क्रमांक राहिला.व्यक्तीगत क्रिडा स्पर्धेत सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू बुलढाणाच्या उषा सोनोने, सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू बुलढाणाचा दिपक माघाडे यांची निवड करण्यात आली . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश अंधारे यांनी केले. तर आभार प्रदर्शन बाळापुरचे विभागीय अधिकारी यांनी केले.अकोला जिल्हा सांस्कृतिक स्पर्धेत प्रथमयेथील स्व. वसंत देसाई क्रीडांगणावर झालेल्या विभागीय महसुल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा समारोप २७ डिसेंबर रोजी संपन्न झाला . त्यामध्ये अकोला, अमरावती,यवतमाळ, वाशिम, बुलढाणा व विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती अशा ६ संघाने सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. त्यामध्ये अकोला जिल्हा सर्वप्रथम तर यवतमाळ जिल्हा व्दितीय स्थानी राहीला तर अमरावती विभागाने तृतीय क्रमांक मिळवीला.रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमअकोला जिल्हयाच्यावतीने जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय व निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांच्या मार्गदर्शनाखाली व उपविभागीय अधिकारी संजय खडसे, यांच्या दिग्दर्शनाखाली मोर्णाच्या तिरावरती हा कार्यक्रम सादर करण्यात आला. त्यामध्ये मोर्णा नदीवर आओ मिलकर हात बढाये हे सामुहिक गीत सादर करण्यात आले. नाटीका , मुकनाटीका, समुहनृत्य , गायन तसेच शिवाजी महाराजांचा शिवराज्यभिषेक कार्यक्रम सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे उत्कुष्ठ दिग्दर्शन प्रथम संजय खडसे, उत्कृष्ट गायन व्दितीय संजय खडसे उत्कृष्ट अभिनय प्रथम राहुल तायडे व्दितीय संजय खडसे, उत्कृष्ठ अभिनय उमा गांवडे , व्दितीय वर्षा भुजाळे, उत्कृष्ठ वादक अरुण इंगळे ,उत्कृष्ट मुकनाटीका स्त्रीभ्रूण हत्या ,उत्कृष्ट वेशभुषा डॉ. निलेश अपार , उत्कृष्ठ संकल्पना ,सादरीकरण ,व गायन असे विविध पुरस्कार मिळवून अकोला जिल्हयाला प्रथम क्रमांक मिळाला आहे. या कार्यक्रमाचे परिक्षक म्हणून प्रा. संजय पाटील व संजय गवई यांनी काम पाहिले.