शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत सोयाबीन, भात, तूर, मूग, उडीद, तीळ, बीटी कापूस, ज्वारी, मका व बाजरीचे बियाणे उपलब्ध करण्यात येणार आहे. या घटकांचा लाभ घेण्याकरिता या योजनेचे अर्ज महाडीबीटी पोर्टलवरून शेतकऱ्यांना १५ मे २०२१ पर्यंत ऑनलाइन भरावे लागणार आहे.
--बॉक्स--
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
आधारकार्ड, सातबारा व खाते उतारा राष्ट्रीयकृत बँकेचे खाते पुस्तक, चालू मोबाईल ओटीपीसाठी सोबत असावा. अंगठा स्कॅनसाठी शेतकरी स्वतः हजर असावा. ही निवड लॉटरी पद्धतीने करण्यात येणार आहे. याबाबतचा संदेश अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त होईल.
--बॉक्स--
अधिक माहितीसाठी यांच्याशी साधा संपर्क
अकोला जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अकोला, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक, कार्यालयीन कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक (आत्मा) डॉ. कांतप्पा खोत यांनी केले आहे.