लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शासनाकडून हमीभावाने मूग, उडिदाची खरेदी करण्यासाठी ऑनलाइन नोंदणीला मंगळवारी चार केंद्रांवर सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी शेतकरी नोंदणीसाठी सुरुवातच झाली नसल्याची माहिती आहे. पहिल्या दिवशी चारही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरळक प्रमाणात शेतकर्यांनी उपस्थिती दाखविली. जिल्हय़ात अल्प पावसाचा तर इतरत्र अति पावसाचा फटका बसल्याने मूग, उडिदाचे पीक राज्यभरात नसल्यासारखेच आहे. त्यातही जे हातात आले, त्याची खरेदी मातीमोल भावाने करीत व्यापार्यांनी शेतकर्यांना नागवणे सुरू केले. त्यावर उपाय म्हणून शासनाने हमीभावाने मूग, उडीद खरेदी ३ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे पणन विभागाला सांगितले. त्यानुसार तालुका खरेदी-विक्री संस्थेकडून कृषी उत्पन्न बाजार समिती केंद्रात खरेदी होणार आहे. त्यासाठी एनईएमएल या संस्थेकडून नोंदणीची प्रक्रिया सुरू होणे आवश्यक होते; मात्र चारही केंद्रांवर लॉगिन आयडी न मिळाल्याने ही नोंदणी सुरू झाली नाही. नोंदणी केलेल्या शेतकर्यांचा एफएक्यू दर्जाच्या मूग, उडीद खरेदी केली जाईल. शेतकर्यांना मूग, उडीद विक्री करण्यासाठी बाजार समितीच्या केंद्रात ऑनलाइन माहिती द्यावी लागणार आहे. त्यामध्ये जमिनीचा सात-बारा, आधार कार्ड, बँकेचे पासबुक घेतले जाईल. सात-बारामध्ये असलेली जमीन आणि त्यामध्ये असलेला पीक पेरा या आधारे शेतकर्यांच्या उत्पादनाची र्मयादा ठरणार आहे. तेवढय़ा क्विंटलची खरेदी केंद्रात केली जाईल. जिल्हय़ात मूग, उडीद खरेदीसाठी पणन महासंघाने अकोला, अकोट, मूर्तिजापूर, तेल्हारा या चार केंद्रांवर सोय केली आहे. त्या ठिकाणी खरेदी-विक्री संस्था आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
मूग, उडीद खरेदीसाठी नोंदणीला सुरुवातच नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2017 2:13 AM
अकोला : शासनाकडून हमीभावाने मूग, उडिदाची खरेदी करण्यासाठी ऑनलाइन नोंदणीला मंगळवारी चार केंद्रांवर सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी शेतकरी नोंदणीसाठी सुरुवातच झाली नसल्याची माहिती आहे. पहिल्या दिवशी चारही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरळक प्रमाणात शेतकर्यांनी उपस्थिती दाखविली.
ठळक मुद्देलॉगिन आयडी नसल्याने नोंदणीत खोडा