लोकमत न्यूज नेटवर्कपोपटखेड : विविध मागण्यांसाठी पुनर्वसित ग्रामस्थांनी २५ डिसेंबर रोजी मेळघाटात धाव घेतली होती. प्रशासनाने मागण्या पूर्ण न केल्याने पुनर्वसित ग्रामस्थांनी पूर्वीच्या गावांमध्ये ठिय्या दिला आहे. तसेच मागणी मान्य न झाल्यास २ जानेवारीपर्यंत आपापल्या जुन्या गावांमध्येच परत जाऊन शेती करण्याचा इशारा पुनर्वसित आदिवासींनी दिला आहे. शेती मिळत नसल्याने अकोट तालुक्यातील पुनर्वसित ग्रामस्थ २५ डिसेंबर रोजी अमोना पोच मार्गाने मेळघाटातील पूर्वीच्या गावात दाखल झाले होते. गेल्या सात दिवसांपासून हे ग्रामस्थ प्रशासनाच्या निर्णयाची प्रतीक्षा करीत आहेत. अकोला जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी १00 कुटुंबांना २00 एकर जमीन येत्या तीन महिन्यांत देण्याचे जाहीर केले होते. ही माहिती पुनर्वसित ग्रामस्थांपर्यंत पोहोचवण्यासाठी २८ डिसेंबर रोजी अकोट उपविभागीय अधिकारी उदय राजपूत, तहसीलदार विश्वनाथ घुगे, धारणी उपविभागीय अधिकारी तसेच डीएफओ गुरुप्रसाद यांच्यासह महसूल व वन विभाग अधिकारी यांनी तेथे भेट दिली होती. तसेच पुनर्वसित आदिवासी लोकांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता; परंतु पुनर्वसित आदिवासी यांनी शंभरपेक्षा जास्त आदिवासी कुटुंबे पात्र असून, त्या सर्वांना शेती द्याल, तरच आम्ही येथून जाऊ, असे सांगितले. त्यानंतर एकही अधिकारी तेथे फिरकलाच नसल्याचे चित्र आहे. पुनर्वसित सर्व ग्रामस्थ पूर्वीच्या केलपाणी गावात आहेत. येत्या २ जानेवारीपर्यंत प्रशासनाने निर्णय घेतला नाही, तर सर्व ग्रामस्थ आपापल्या मूळ गावी परत जाऊन पूर्वीची शेती करणार असल्याचा इशारा प्रकाश डाखोरे, मदन बेलसरे, विष्णू राऊत, नंदकिशोर जामुनकर, सागर भोयर आदींनी दिला आहे.
विविध मागण्यांसाठी पुनर्वसित आदिवासींचा मेळघाटातच ठिय्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 12:32 AM
पोपटखेड : विविध मागण्यांसाठी पुनर्वसित ग्रामस्थांनी २५ डिसेंबर रोजी मेळघाटात धाव घेतली होती. प्रशासनाने मागण्या पूर्ण न केल्याने पुनर्वसित ग्रामस्थांनी पूर्वीच्या गावांमध्ये ठिय्या दिला आहे. तसेच मागणी मान्य न झाल्यास २ जानेवारीपर्यंत आपापल्या जुन्या गावांमध्येच परत जाऊन शेती करण्याचा इशारा पुनर्वसित आदिवासींनी दिला आहे.
ठळक मुद्देमागण्या मान्य न झाल्यास मूळ गावात जाण्याचा इशारा