शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
2
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
3
"महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
4
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
5
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
6
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
7
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
8
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
10
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
11
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
12
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
13
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
14
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
15
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
16
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
17
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
18
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
19
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
20
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण

मेळघाटातून पुनर्वसित ग्रामस्थ मध्यरात्री गावाकडे परतण्यास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 3:01 AM

अकोट / पोपटखेड : अकोट तालुक्यातील पुनर्वसित ग्रामस्थांनी सुविधेचा अभाव व मृत्यूच्या तांडवाच्या भीतीने मेळघाटात ९ सप्टेंबर रोजी परतले. प्रशासनाचा आदेश झुगारून रात्रभर पायी चालल्यानंतर या ग्रामस्थांनी व्याघ्र प्रकल्पातील मूळ गावी मुक्काम ठोकला. या ग्रामस्थांची समजूत काढण्याकरिता  १0 सप्टेंबर रोजी सकाळी वन व महसूल प्रशासनाचे अधिकारी या ठिकाणी पोहोचले. 

ठळक मुद्देप्रभाव लोकमतचामुख्यमंत्र्यांनी घेतली दखलआठवड्यात मुंबईला बैठक

विजय शिंदे/ गौतम कदम । लोकमत न्यूज नेटवर्कअकोट / पोपटखेड : अकोट तालुक्यातील पुनर्वसित ग्रामस्थांनी सुविधेचा अभाव व मृत्यूच्या तांडवाच्या भीतीने मेळघाटात ९ सप्टेंबर रोजी परतले. प्रशासनाचा आदेश झुगारून रात्रभर पायी चालल्यानंतर या ग्रामस्थांनी व्याघ्र प्रकल्पातील मूळ गावी मुक्काम ठोकला. या ग्रामस्थांची समजूत काढण्याकरिता  १0 सप्टेंबर रोजी सकाळी वन व महसूल प्रशासनाचे अधिकारी या ठिकाणी पोहोचले. दिवसभर चाललेल्या बैठकीनंतर सर्व मागण्या शासन पूर्ण करणार असल्याचे आश्‍वासन देऊन ग्रामस्थांचे मन वळविण्याचा प्रशासनाने प्रयत्न केला. प्रशासनाला आश्‍वासन पाळण्याचा अल्टिमेटम देत सायंकाळपर्यंत दोन बसेस ग्रामस्थांना घेऊन खटकाली गेटवर परतल्या होत्या. दरम्यान, पुनर्वसित गावकर्‍यांच्या या आंदोलनाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली असून, येत्या आठवड्यात मुंबई येथे बैठक बोलाविण्यात आली असल्याने मध्यरात्री ग्रामस्थ गावाकडे परतण्यास सुरुवात झाली होती. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गाभाक्षेत्रातील अमोना, बारुखेडा, धारगड, गुल्लरघाट, सोमठाणा खुर्द, सोमठाणा बु., नागरतास व केलपानी  या गावांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. परंतु, वन विभागाने दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता झाली नाही, तसेच महसूल प्रशासनाने सुविधा  पुरविल्या नाहीत. त्यामुळे हे ग्रामस्थ मुला-बाळांसह पोपटखेड व खटकालीचे गेट तोडून मेळघाटात गेले होते. यावेळी अन्यायाने त्रस्त झालेल्या पुनर्वसित गावकर्‍यांनी गुन्हे दाखल करण्याचा आदेश व तैनात असलेल्या पोलीस व वन विभागाच्या ताफ्याला न जुमानता मेळघाटात धडक दिली. त्यामुळे हादरलेले प्रशासन १0 सप्टेंबर रोजी सकाळीच  खटकाली गेटवरून मेळघाटात दाखल झालेल्या ग्रामस्थांजवळ पोहोचले. याठिकाणी ग्रामस्थांनी वन विभागातील काही अधिकार्‍यांनी केलेला अन्याय पुनर्वसनाच्या रकमेवरून झालेली हेळसांड, रोजगार व शेती नसल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न व आरोग्यासह वातावरण मानवत नसताना पुनर्वसित गावात असलेल्या असुविधेचा पाढा वाचला. या ठिकाणी उपस्थित असलेल्या अकोला जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, अमरावती जिल्हाधिकारी अभिजित बांगर, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य उपवनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी, उपवनसंरक्षक विशाल माळी, सुनील शर्मा, अकोट उपविभागीय अधिकारी उदय राजपूत, अचलपूर उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, अकोट तहसीलदार विश्‍वनाथ घुगे, सहायक उपवनसंरक्षक संजय पार्डीकर,  गटविकास अधिकारी कालीदास तापी यांनी पुनर्वसित ग्रामस्थांच्या व्यथा ऐकून घेतल्या. 

पुनर्वसित गावकर्‍यांवर झालेला अन्याय व असुविधेनंतर मेळघाटात परतलेल्या घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीरतेने दखल घेतली आहे. पुनर्वसित गावकर्‍यांच्या मागण्या पूर्ण करण्याकरिता आणि चर्चा करण्याकरिता येत्या आठवड्यात मुंबई येथे बैठक बोलाविण्यात येणार असल्याचे राज्याचे मुख्य सचिव डॉ. प्रवीण परदेशी यांनी १0 सप्टेंबर रोजी दुपारी सांगितले. - राजकुमार पटेल, माजी आमदार, मेळघाट