शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
2
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
3
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
4
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
5
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
6
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
7
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
8
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
9
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
10
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
11
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
12
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
13
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
14
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
15
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
16
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
17
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
18
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
19
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
20
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज

पुनर्वसित गावकऱ्यांची मेळघाट जंगलात आगेकूच; पोपटखेड गेट पार केले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 2:03 PM

आकोट/ पोपटखेड: मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून अकोट तालुक्यात पुनर्वसित झालेल्या आठ गावातील ग्रामस्थांनी पुन्हा मेळघाटकडे आगेकूच केली आहे. उपवनसंरक्षक कार्यालयात निवेदन देऊन गावकऱ्यांनी पोपटखेड गेट पार करून जंगलात प्रवेश केला आहे.

आकोट/ पोपटखेड: मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून अकोट तालुक्यात पुनर्वसित झालेल्या आठ गावातील ग्रामस्थांनी पुन्हा मेळघाटकडे आगेकूच केली आहे. उपवनसंरक्षक कार्यालयात निवेदन देऊन गावकऱ्यांनी पोपटखेड गेट पार करून जंगलात प्रवेश केला आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात वन विभागाचा व पोलिसांचा ताफा तैनात होता; परंतु आपल्या हक्क मागणीकरिता एकवटलेले ग्रामस्थ थेट खटकाली गेटपर्यंत पोहचले.मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील नागरतास, अमोना, बारुखेडा, धारगड, गुल्लरघाट, सोमठाणा, केलपाणी या गावांचे पुनर्वसन करण्यात आले. पुनर्वसनामुळे शेतजमीन गेली, उपजीविकेचे साधन नाही. शिवाय वातावरण मानवत नसल्याने विविध आजाराने २७४ पुनर्वसित ग्रामस्थांचा मृत्यू झाला. आतापर्यंत करण्यात आलेल्या कोणत्याही मागण्यांची पूर्तता न झाल्याने आमच्या जुन्या गावी परत जात आहोत. आता मेलो तरी जंगलातून बाहेर निघणार नाही. कोणी आता आश्वासने देऊ नये, शासनावर व अधिकाऱ्यांवर आमचा विश्वास नाही. आमचे रेशनपाणी आणण्याकरिता रस्ता मोकळा करून द्यावा, अशा आशयाचे निवेदन उपवनसंरक्षक कार्यालयात सोमवारी सकाळी दिले. त्यानंतर केलपाणी येथे एकत्र आलेल्या ५०० ते ६०० ग्रामस्थांनी वन विभागाच्या पोपटखेड गेटवर पोहचले. या ठिकाणी त्यांना वन विभाग व पोलिसांनी अडविण्याचा प्रयत्न केला असता संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी गेट पायदळी तुडवित आतमध्ये प्रवेश घेतला. सोबत उदरनिर्वाहाचे साधन, मुलेबाळे व काही जणांनी जनावरेसुद्धा सोबत घेऊन जुन्या गावाची वाट धरली. यावेळी उपवनसंरक्षक देवला यांनी आपली नव्यानेच या ठिकाणी नियुक्ती झाली आहे, त्यामुळे थोडा वेळ द्या, असे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला; परंतु ग्रामस्थांनी यापूर्वी असलेल्या उपवनसंरक्षक गुरुप्रसाद यांनीसुद्धा आम्हाला असेच आश्वासन दिले. त्यांची बदली झाली; परंतु आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत. त्यामुळे जुन्या गावी परतण्याच्या निर्धारावर कायम राहिले. यावेळी घटनास्थळावर उपवनसंरक्षक देवला, उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत, तहसीलदार विश्वनाथ घुगे, उपविभागीय अधिकारी सुनील सोनवणे, अकोट ग्रामीण पोलीस निरीक्षक मिलिंद बहाकर, पोलीस उपनिरीक्षक शहाजी रूपनर तसेच वन विभागाचा ताफा, ग्रामीण पोलीस व महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी हजर होते. दरम्यान, जंगलात घुसलेल्या पुनर्वसित गावकºयांनी पोपटखेड गेट पार केल्यानंतर आपला पहिला पडाव खटकाली गेटसमोर टाकला आहे. दरम्यान, पुनर्वसित गावकरी व वन विभाग, पोलीस यांच्यात संघर्षाची स्थिती असल्याचे वृत्त बाहेर येत आहे.

पुनर्वसित गावकरी तिसऱ्यांदा गावाकडे परतलेआठ गावातील पुनर्वसित गावकरी यापूर्वी दोन वेळा आपल्या जुन्या गावी परतले होते. दरम्यान, वन विभाग व महसूल विभागाने त्यांच्या आंदोलनाची दखल घेत अकोट व तेल्हारा तालुक्यातील पुनर्वसित गावात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देत सोयी, सुविधा व पायाभूत विकासकामांना गती देण्याचा प्रयत्न केला. महसूल प्रशासनाने ११५ एकर जमीन पुनर्वसित गावकºयांना देण्याकरिता उपलब्ध केली होती; परंतु पुनर्वसित गावकऱ्यांनी पुनर्वसन करताना आश्वासन देत शासनाने कुठल्याही सोयी, सुविधा आजपावेतो पूर्ण केल्या नाहीत. जमीनसुद्धा मुबलक प्रमाणात सर्वांनाच उपलब्ध होत नाही, रोजगाराचे साधन नाही, आदी विविध अडचणी व व्यथा घेऊन अकोला येथेसुद्धा ५० कि.मी. पायदळ गेले होते. दरम्यान, मागण्यांची पूर्तता न झाल्याने कंटाळलो असून, हताश झालो आहे, उपासमारीची वेळ आल्याने पुन्हा जंगलामध्ये मूळ गावी जाण्याशिवाय पर्याय नसल्याचे नमूद करत जुन्या गावी निघाले.

 

टॅग्स :AkolaअकोलाakotअकोटMelghatमेळघाट