लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : आपातापा येथील ७३ वर्षीय वृद्धेच्या पोटात दुखत असल्याने तिला बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले होते; मात्र दाखल केल्यापासून महिलेवर उपचारच केला नसल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी गुरुवारी सर्वोपचार रुग्णालयात गदारोळ केला.पोटात दुखत असल्याने आपातापा येथील ७३ वर्षीय वृद्धेला बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दाखल करण्यात आल्यापासून रुग्णाची कुठलीच चाचणी करण्यात आली नसल्याचे रुग्णाच्या नातेवाइकांकडून सांगण्यात आले. उपचार होत नसल्याने रुग्णाला नेमके काय झाले, हे कळण्यापूर्वीच गुरुवारी सकाळी त्या महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर डॉक्टरांनी महिलेचे शवविच्छेदन करावे लागणार असल्याचे नातेवाइकांना सांगितल्याने नातेवाइकांनी एकच गदारोळ केला. जवळपास २४ तासात रुग्णावर कुठलाही उपचार न झाल्याने, तसेच कुठल्याच प्रकारच्या चाचण्या न केल्याने नातेवाइकांनी चांगलाच दगारोळ केला; परंतु यानंतर लोकप्रतिनिधींच्या मध्यस्थीने हे प्रकरण शांत करण्यात आले.
महिला रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा गदारोळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2020 10:36 AM