अमरावती येथून म्हैसांग मार्गे एम एच ३० बीडी २८२२ व एम एच ३० बीडी २६२५ क्रमांकाच्या वाहनांमध्ये गुरांना कत्तलीसाठी अकाेल्यात आणण्यात येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख संताेष महल्ले यांना मिळाली़ या माहितीवरून त्यांनी पथकाला पाळत ठेवण्याचे निर्देश दिले़ यावरुन पथकाने ताजनापेठ परिसरात सापळा रचला असता दाेन्ही वाहने या ठिकाणी आले मात्र पाेलीस असल्याचा संशय येताच ही वाहने दुसऱ्या मार्गाने पळविली़ पाेलिसांनी पाठलाग केला असता दाेन्ही वाहन चालकांनी ही वाहने कसाइपुरा येथे उभी करून पळ काढला़ पाेलिसांनी वाहनाची तपासणी केली असता यामध्ये तब्बल २३ गुरांची कत्तलीसाठी काेंबून वाहतूक सुरू असल्याचे उघड झाले़ पाेलिसांनी गुरांची सुटका करीत त्यांना गाैरक्षण संस्थेत पाठविले़ या गुरांची कत्तलीसाठी वाहतूक करणारे अस्लम शहा वजीर शहा रा़ आकाेट फैल, माेहसीन शहा सनाउल्ला शहा रा़ पाचमाेरी अकाेला, व माेहम्मद शहा या तिघांविरुध्द रामदास पेठ पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ त्यानंतर आकाेट फैलातील इंदिरा नगर येथेही गुरांना कत्तलीसाठी बांधून ठेवल्याची माहीती मिळाली़ यावरून पाेलिसांनी छापा टाकून या ठिकाणावरून १३ गुरांची सुटका केली़ या गुरांची किंमत सुमारे एक लाख रुपये असून दाेन कारवायांमध्ये दाेन लाख रुपयांची गुरे व दाेन वाहने असा एकून ९ लाख रुपयांचा मुद्देमाल पाेलिसांनी जप्त केला़ या गुरांना कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या शेख रफीक शेख बाबू याच्याविरुध्द आकाेट फैल पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या कारवाया पोलीस अधिक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक मोनिक राउत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख संतोष महल्ले, नितीन चव्हाण, गोपीलाल मावळे, फिरोज खान, संदीप काटकर, शक्ती कांबळे, वीरेंद्र लाड, विजय कवळे यांनी केली.
कत्तलीसाठी नेण्यात येत असलेल्या ३६ गुरांची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 4:20 AM