शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

रिलायन्स जिओचे केबल जप्त; महापालिकेची कारवाई वादाच्या भोवऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2019 12:57 PM

अकोला: महापालिकेची मुख्य जलवाहिनी फोडणाºया रिलायन्स जिओ इन्फोकॉम कंपनीकडून दंडापोटी १२ लाख रुपये वसूल करण्यात सपशेल अपयशी ठरलेल्या प्रशासनाने मंगळवारी अचानक तापडिया नगर परिसरात रिलायन्स कंपनीचे केबल जप्त करण्याची कारवाई केली.

अकोला: महापालिकेची मुख्य जलवाहिनी फोडणाºया रिलायन्स जिओ इन्फोकॉम कंपनीकडून दंडापोटी १२ लाख रुपये वसूल करण्यात सपशेल अपयशी ठरलेल्या प्रशासनाने मंगळवारी अचानक तापडिया नगर परिसरात रिलायन्स कंपनीचे केबल जप्त करण्याची कारवाई केली. शहरात इतरही कंपन्यांकडून अवैधरीत्या के बलचे जाळे टाकल्या जात असल्यामुळे प्रशासनाची कारवाई वादाच्या भोवºयात सापडली आहे.तापडिया नगर परिसरात रिलायन्स जिओ इन्फोकॉम कंपनीकडून पोलवरून फायबर आॅप्टिक केबलचे जाळे टाकल्या जात होते. या कामासाठी संबंधित कंपनीच्या प्रतिनिधीने मनपाची परवानगी घेतली नसल्याचा मुद्दा उपस्थित करीत महापालिकेच्या विद्युत विभागाचे उपअभियंता अमोल डोईफोडे व अतिक्रमण विभाग प्रमुख नरेंद्र घनबहादूर यांनी केबल जप्त करण्याची कारवाई केली.जलवाहिनी फोडली तरीही...रिलायन्स कंपनीच्या खोदकामात खडकी रोडवरील मनपाची मुख्य जलवाहिनी फुटली होती. त्यावेळी ऐन पाणीटंचाईच्या काळात लाखो लीटर पाण्याचा अपव्यय झाला होता. याप्रकरणी भाजप नगरसेवक विजय इंगळे यांच्या तक्रारीवरून जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश हुंगे यांनी खदान पोलीस ठाण्यात रिलायन्स कंपनीच्या विरोधात फौजदारी तक्रार नोंदविली होती, तसेच पाण्याचा अपव्यय केल्याप्रकरणी १२ लाख रुपयांचा दंड आकारला होता. वर्षभराचा कालावधी उलटून गेला असला, तरी आजपर्यंतही कंपनीने दंडात्मक रकमेचा भरणा केला नाही. याप्रकरणी कंपनीला सत्तापक्षातील पदाधिकाºयांचे अभय असल्याची चर्चा आहे. आता नवनियुक्त आयुक्त संजय कापडणीस रिलायन्स कंपनीकडून दंडात्मक रकम वसूल करतात की अभय देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका