शहरं
Join us  
Trending Stories
1
CM शिंदेंनी शिवसेनेचा पहिला उमेदवार केला जाहीर, जयस्वालांना 'या' मतदारसंघातून तिकीट
2
Shubham Lonkar: अकोल्याचा शुभम वर्षभरापासून लॉरेन्स टोळीच्या संपर्कात
3
भुजबळ-जरांगे समर्थक आमने-सामने; महामार्गावरील वाहतूक रोखली, येवल्यात तणाव!
4
Ind vs Aus Women: भारताच्या आशा मावळल्या! ऑस्ट्रेलियाने 9 धावांनी केला पराभव
5
पुण्यात काँग्रेसमध्ये तिकिटासाठी गर्दी! २१ विधानसभा मतदारसंघासाठी झाल्या मुलाखती
6
छातीत कळ आली अन्...; नांदेडमध्ये 'लाडकी बहीण' कार्यक्रमाला आलेल्या महिलेचा मृत्यू
7
मोठी बातमी! बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात पुण्यातून एकाला अटक, आरोपी कोण?
8
Baba Siddique : 'ती' पोस्ट करणारा अकोल्याचा शुभम लोणकर भावासह फरार, पोलिसांकडून शोध
9
बाबा सिद्दिकींच्या हत्येमागे 'रिअल इस्टेट' कनेक्शन?; केआरकेच्या पोस्टमुळे नवी चर्चा
10
Baba Siddique यांना खरंच वाय दर्जाची सुरक्षा होती का? अखेर उत्तर मिळालं
11
बाबा सिद्दिकी हत्याकांडातील चौथ्या आरोपीची ओळख पटली; पोलीस जसीन अख्तरच्या मागावर
12
नाशिकमध्ये अग्निवीरांचा मृत्यू; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदी-राजनाथ सिंहांना तीन सवाल
13
'महाराष्ट्र राजकीय परिवर्तनासाठी सज्ज', विधानसभा निवडणुकीबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
14
१६ ऑक्टोबरला नवीन पल्सर लाँच होणार? पहिल्या सीएनजी बाईकला टक्कर देणार!
15
चांदीने १ लाखाचा टप्पा केला पार; जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर?
16
बाबा सिद्दिकी हत्या : एका आरोपीला पोलीस कोठडी, तर दुसऱ्याला..., न्यायालयाचा आदेश काय?
17
बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी केली फेसबुक पोस्ट; पोलिस घरी पोहोचले, त्याआधीच शुभम झाला गायब
18
Baba Siddique : "२०१९ ला जेलमध्ये गेला, जामीन कसा मिळाला माहीत नाही; ११ वर्षांपूर्वीच घरातून हाकलून दिलं"
19
"उद्धव ठाकरे, सारखं वाघनखं काढतंय; एकनाथ शिंदे, ते एक पुष्पा वेगळंच"; राज ठाकरे बरसले
20
"मी तुमचा चित्रपट बनवेन - एक था MLA", दाऊद इब्राहिमनं एकदा बाबा सिद्दिकींना दिली होती धमकी

मुख्य रस्त्यालगतची धार्मिक स्थळे भुईसपाट

By admin | Published: May 03, 2017 1:10 AM

अकोला : शहराच्या विविध भागात मुख्य रस्त्यालगत उभारलेल्या तसेच वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या धार्मिक स्थळांना हटविण्याची कारवाई मंगळवारी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने केली.

अकोला : शहराच्या विविध भागात मुख्य रस्त्यालगत उभारलेल्या तसेच वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या धार्मिक स्थळांना हटविण्याची कारवाई मंगळवारी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने केली. अतिक्रमण हटविताना मनपाच्या पथकाने भेदभाव केल्याचा आरोप पश्चिम झोनमधील डाबकी रोड परिसरातील व्यावसायिकांनी केला. शहरातील मुख्य रस्त्यांची दुरुस्ती व रुंदीकरणाची कामे महापालिका प्रशासनाने सुरू केली आहेत. मुख्य रस्त्यालगत दुकाने थाटणाऱ्या व्यावसायिकांनी दुकानांच्या समोर अनधिकृतपणे धार्मिक स्थळे उभारली. यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होण्यासह साफसफाईच्या कामांना अडथळा सुरू झाला. यासंदर्भात मनपाच्या सभागृहात नगरसेवकांनी पोटतिडकीने समस्या मांडल्या होत्या. त्याची दखल घेत महापौर विजय अग्रवाल यांनी अतिक्रमणाची समस्या दूर करण्याचे निर्देश अतिक्रमण विभागाला दिले होते. त्या पृष्ठभूमीवर मंगळवारी विविध झोनमधील अतिक्रमणासह रस्त्यालगतच्या धार्मिक स्थळांना हटविण्याची कारवाई क्षेत्रीय अधिकारी जी.एम. पांडे, राजेंद्र घनबहादूर, सहायक नगररचनाकार संदीप गावंडे, नरेश बोरकर व कर्मचाऱ्यांनी पार पाडली. या भागातील स्थळे जमीनदोस्तपश्चिम झोन अंतर्गत येणाऱ्या कॅनॉलपासून ते राजकमल हॉटेलपर्यंत व्यावसायिकांनी रस्त्यालगत उभारलेले अतिक्रमण तसेच धार्मिक स्थळ धाराशाही करण्यात आले. उत्तर झोनमध्ये तार फैल, कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील धार्मिक स्थळ, मनकर्णा प्लॉट, बीएसएनल आॅफिससमोर तसेच अकोट फैल पोलीस ठाण्यालगतचे धार्मिक स्थळ हटविण्यात आले.