अकोट : शहरातील शासकीय व सार्वजनिक जागांवर अतिक्रमण करून उभारलेली धार्मिक स्थळे ८ मार्च पर्यंत हटवा अन्यथा ९ मार्चपासून धडक कारवाई करण्यात येईल, अशी नोटीस नगरपालिका प्रशासनाने काढल्यानंतर नागरिकांकडून स्वयंस्फुर्तीने धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्यास सुरुवात झाली आहे. याचाच एक भाग म्हणून अकोट शहरातील शिवाजी चौकातील ३५० वर्ष प्राचीन असलेल्या दोन दर्ग्यांमधील कबरींचे सोमवारी शांततेत स्थानांतर करण्यात आले.शहरातील दहा धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्या बाबत महाराष्ट्र शासनाचे निर्देश प्राप्त झाल्यानंतर अकोट शहराची संवेदनशीलता पाहता अकोट शहर पोलिस निरीक्षक गजानन शेळके यांनी प्रत्येक धार्मिक स्थळांच्या पदाधिकाºयांची वेगवेगळी बैठक घेऊन सदर धार्मिक स्थळ निष्कासनाची अपरिहार्यता त्यांचे लक्ष्यात आणून देऊन प्रशासनास सहकार्य करण्या चे आवाहन केले होत. त्या आव्हानाला व्यापक प्रतिसाद मिळून हिंदू, मुस्लिम व बौद्ध बांधवानी हळू हळू स्वत:हून धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्यास सुरू केले आहे. अतिक्रमण हटविण्याच्या दुसऱ्या टप्प्यात एकूण १० धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्यात येणार आहे. ज्या मध्ये सर्वात महत्वाचे अंदाजे ३५० वर्षांपूर्वी सध्याच्या शिवाजी चौकात असलेले २ दर्गे अतिशय महत्वाचे आहेत. त्या पैकी अकोट शहरातील मुश्ताक अली मोहम्मद अली यांच्यापूर्वजांची कबर असलेला पीर करोडी दर्गा, व मोहम्मद अली सय्यद जाफर यांच्या पूर्वजांची कबर असलेला गैबी शाह बाबा दर्ग्याच्या समावेश आहे. मुस्लिम समाजाचे धार्मिक भावनेचा विचार करता, सदर दर्ग्यांच्या निष्कासन करण्या पूर्वी दोन्ही दग्यार्तील कबरीचे विधिवत स्थलांतर होणे अंत्यत आवश्यक होते. याचा विचार करून पोलिस निरीक्षक गजानन शेळके यांनी दोन्ही दर्ग्या चे सध्याचे वारस असलेले अनुक्रमे मुश्ताक अली मोहम्मद अली व मोहम्मद अली सय्यद अली यांच्यासोबत चर्चा केली. दोन्ही मुस्लिम बांधवांनी अतिशय सकारात्मक भूमिका घेऊन प्रशासनास सहकार्य करण्याची तयारी दाखविली व सदर कबरी मधील माती विधिवत धार्मिक पद्धतीने योग्य ठिकाणी स्वत:हून स्थलांतरित करून सदर धार्मिक स्थळ हटविण्यात मोलाची भूमिका बजावली. त्या अनुषंगाने सोमवारी पहाटे ४. ३० वाजे पासून सदर प्रक्रियेस सुरवात करून सकाळी ७ वाजे पर्यंत दोन्हीही कबरी खोदून त्या मधील माती धार्मिक पद्धतीने विधिवत दुसºया योग्य ठिकाणी स्थलांतरित करण्यात आली. संवेदनशील अकोट शहरात हिंदू, मुस्लिम व बौद्ध बांधव घेत असलेल्या समंजस भूमिके मूळे, अकोट शहरावर लागलेला संवेदनशीलतेचा डाग पुसण्यास निश्चितपणे मदत होणार असल्याने पोलिस निरीक्षक गजानन शेळके यांनी हिंदु, मुस्लिम, बौद्ध बांधवांचे अभिनंदन करून आभार व्यक्त केले आहे, आजची कारवाई पोलिस अधीक्षक कला सागर , अप्पर पोलिस अधीक्षक विजयकांत सागर, उपविभागीय पोलिस अधिकारी छगन राव इंगळे ह्यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गजानन शेळके, सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानोबा फड, पोलिस उपनिरीक्षक महेंद्र गवई, गणेश पाटील व कर्मचाºयांनी केली, कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.