काटेपुर्णा, वान प्रकल्पाच्या साठ्यात वाढ !
अकोला : जिल्ह्यात जुलै महिन्यात दमदार पाऊस झाला. त्यामुळे प्रकल्पांच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे. काटेपूर्णा प्रकल्पात ८१.३३ तर वान प्रकल्पात ५५ टक्के साठा उपलब्ध झाला आहे. तसेच निर्गुणा, मोर्णा प्रकल्प व उमा बॅरेजमध्ये ही साठा वाढला आहे. रब्बीच्या सिंचनासाठी आणखी दमदार पावसाची प्रतीक्षा असून प्रकल्पांच्या साठ्यात ही वाढ अपेक्षित आहे. ऑगस्ट महिन्यात अद्यापतरी चांगला पाऊस बरसला नाही.
पालखी व कावड महोत्सव संदर्भात बैठक
अकोला : उपविभागीय दंडाधिकारी यांच्या दालनात अकोला येथील पुरातन श्री राजराजेश्वर मंदिर येथे पालखी व कावड महोत्सव बद्दल बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये उपविभागीय अधिकारी निलेश अपार, पोलीस उपविभागीय अधिकारी कदम, श्री राजराजेश्वर मंदिराचे सचिव ॲड. आर. एस. ठाकरे, भौरदकर, लोहिया, सार्वजनिक पालखी व कावड महोत्सव समितीचे अध्यक्ष राजेश भारती, शांतता समितीचे अध्यक्ष ॲड. पप्पू मोरवाल, पालखी मंडळाचे पदाधिकारी महादेव गायकवाड, विनोद शर्मा, विजय जामनिक, अभिलाष तायडे, आशिष पांडे, अरुण डावरे आदी उपस्थित होते. भारती यांनी सर्व कावड व पालखी यांना अभिषेक करण्याची परवानगी देण्याची मागणी केली. प्रशासनाने देखील यावर लवकरच सकारात्मक तोडगा काढण्याचे वचन दिले.