लाभार्थी घरकुलच्या प्रतीक्षेत
अकाेला: केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास याेजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करून देणे महापालिकेची जबाबदारी असताना प्रशासनाकडून लाभार्थ्यांची हेटाळणी केली जात असल्याचे दिसून येत आहे. यामुळे घरकुलसाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांवर मनपाचे हेलपाटे घेण्याची वेळ आली असून असंख्य लाभार्थी हक्काचे घर मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
गुटख्याची खुलेआम विक्री
अकाेला: शहरातील पानटपरी व गल्लीबाेळातील दुकानांमधून गुटखा व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम विक्री केली जात आहे. शाळा, महाविद्यालयाच्या परिसरात विक्री हाेत असताना अन्न व औषधी प्रशासन तसेच पाेलीस प्रशासनाकडून डाेळेझाक केली जात असल्याचे चित्र आहे. याप्रकाराकडे महाविद्यालय व्यवस्थापनासह पाेलीस प्रशासनाचे दुर्लक्ष हाेत आहे.
उस्मानीविराेधात कारवाई करा!
अकाेला: पुणे येथील एल्गार परिषदेत हिंदू समाजाबद्दल अवमानकारक उद्गार काढणाऱ्या शरजिल उस्मानी याच्या विराेधात कठाेर कारवाई करण्याची मागणी भाजयुमाेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. यामुळे हिंदू समाजात तीव्र असंताेष निर्माण झाला असल्याचे नमूद करण्यात आले असून तशा आशयाचे निवेदन मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आले आहे.
नि:शुल्क गर्भसंस्कार कार्र्यशाळा
अकाेला: अखिल विश्व गायत्री परिवार शांतिकुंज हरिद्वारच्या गायत्री परिवार अकाेलाच्यावतीने येथील जानाेरकर मंगल कार्र्यालयात नि:शुल्क गर्भसंस्कार मार्गदर्शन कार्र्यशाळेचे आयाेजन करण्यात आले हाेते. कार्यशाळेत परिसरातील अनेक महिलांनी उपस्थिती लावली हाेती. यावेळी शहरातील तज्ज्ञ डाॅक्टरांनी मार्गदर्शन केले.
सिग्नल नसल्यामुळे वाहतुकीची काेंडी
अकाेला: शहरातील वाशिम बायपास चाैकात सिग्नल व्यवस्था नसल्यामुळे याठिकाणी वाहतुकीची काेंडी हाेत आहे. या चाैकातून पातूर, खामगाव, मेहकर आदी गावांना जाण्याचा मार्ग आहे. त्यामुळे या चाैकात जड वाहनांसह प्रवासी वाहतुकीची माेठी वर्दळ राहते. शिवाय रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम सुुरू असल्याने वाहतूक विस्कळीत हाेत आहे.
काैलखेड चाैकात वाहतुकीचा खाेळंबा!
अकाेला:शहरातील काैलखेड चाैकाला अतिक्रमणाचा विळखा पडला असून मुख्य रस्त्याच्या दाेन्ही बाजूला भाजीपाला विक्रेता, फळ व्यावसायिकांसह विविध साहित्याची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत. या चाैकातून जड वाहतुकीसह प्रवासी वाहनांची माेठी वर्दळ दिसून येते. रविवारी अतिक्रमणाच्या समस्येमुळे चाैकात वाहतुकीचा खाेळंबा निर्माण झाला हाेता.