महान (जि. अकोला), दि. 0८- मागील दोन दिवसांपासून मालेगाव, जऊळका, काटाकोंडाळा, अमरवाडी, मुसळवाडी, धनोरा या भागात हलका पाऊस झाल्याने धरणाच्या जलसाठय़ात हळूहळू वाढ होत आहे. त्यामुळे, ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता जलसाठा ११४१.१0 फूटवर पोहोचला होता. त्यामुळे सकाळी ६.३0 वाजता महान धरणाचे दोन गेट अर्धा फुटाने उघडून अतिरिक्त १0 पाइंट जलसाठा नदीपात्रात विसजिर्त करण्यात आला.साडेपाच तासांपर्यंत धरणाचे गेट उघडण्यात आले व दुपारी १२ वाजता जलसाठा ११४१ फुटावर आल्याने दोन्ही गेट बंद करण्यात आले.
‘काटेपूर्णा’तून पुन्हा विसर्ग!
By admin | Published: October 09, 2016 2:54 AM