अकोट : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या बेताल वक्तव्यामुळे शिवसैनिकांनी शहरातील शिवाजी चौकात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रतिकृतीची गाढवावरून धिंड काढत काळ्या पट्ट्या दाखवित निषेध व्यक्त केला.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे, शहरप्रमुख सुनील रंधे, प्रा. अतुल म्हैसने, उपजिल्हा संघटक विक्रम जायले, तालुका संघटक रोशन पर्वतकर, शहर संघटक कमल वर्मा, अवी गावंडे सरपंच, धीरज गिते सरपंच, उपजिल्हा संघटिका लक्ष्मी सारीशे, विजय ढेपे, दीपक इंगळे, ज्ञानेश्वर ढोले, ज्ञानेश्वर बोरोकार, राजेंद्र मोरे, मुरलीधर खोटे, राधेश्याम जामुनकर, सुभाष सुरतने, विजय भारसाकळे, अक्षय घायल, गोपाल म्हैसने, अतुल नवात्रे, दिलीप लेलेकर, दीपक रेखाते, कुणाल कुलट, संजय, भट्टी, संतोष बुंदेले, अतुल नवत्रे, नीलेश वाघ, कार्तिक सुरतने, नीलेश मोगरे, रमेश कोरेलवा, विलास ठाकरे, केशव थोरात, सुनील कातोरे, बबन गटकर, विलासराव सारीशे, गोपाल कावरे, अमोल पालेकर, बाळासाहेब नाठे, गणेश चंडालिया, राजेंद्र मोरे, कार्तिक खाडेकर, वीरेंद्र बरेठिया, प्रशांत येऊल, सुरेश शेंडोकार, प्रथमेश बोरोडे, नयन तेलगोटे, कमल वर्मा, योगेश सुरतने, राजेश भारसाकळे, अविनाश गावंडे, सोपान साबळे, दिगांबर बेलुरकर, शिवा गोटे, संजय रेळे, रविराज ढगे, प्रीतिपाल पालवे, अंकुश बोचे, संतोष ईपर, प्रफुल बोरकुटे, प्रशांत रनगिरे, किसना मोडशे, हर्षल अस्वार, शुभम थोरात, दत्ता डिक्कर, ज्ञानेश्वर बोरोकार, सागर गिते, नारायण, संतोष बुंदेले नारायण पोटे, अभिषेक डिक्कर, यांच्यासह शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी अकोट शहर पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
------------------
राणे समर्थक भारसाकळे!
सध्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे सोबतच आमदार प्रकाश भारसाकळे यांनी शिवसेना पक्षातून बाहेर पडले होते. त्यानंतर काँग्रेस पक्ष आणि सध्या दोघेही भाजपा पक्षात आहेत. अशा राजकीय परिस्थितीत राणे समर्थक आमदार भारसाकळे यांच्या मतदारसंघात केंद्रीय मंत्री नारायण राणेंची गाढवावरून धिंड काढली, निषेध करीत भाजपच्या नावाने शिमगा केला. अशा स्थितीत भाजप कार्यकर्त्यांना कुठलेही आदेश नसल्याने कुठलाही प्रतिकार न करता डोळ्यासमोर गाढवावरील धिंड आंदोलन निमूटपणे बघतच राहत असल्याचे प्रतिक्रिया शहरात व्यक्त होत होत्या.