शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
2
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
3
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
4
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
5
प्रियांका गांधींनी गुंतवलेल्या Mutual Fund नं किती दिले रिटर्न? तुमच्यासाठी फायद्याचा सौदा आहे की नाही?
6
Laxmi Pujan 2024: लक्ष्मीपूजेत केरसुणीची पूजा केल्यावर लक्षात ठेवा 'हे' नियम; अन्यथा पूजा जाईल व्यर्थ!
7
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
8
IND vs NZ 3rd Test : न्यूझीलंडनं टॉस जिंकला, मॅच कोण जिंकणार?
9
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
11
अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती! घेतलं नवीन घर, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक
12
Laxmi Pujan Muhurta 2024: लक्ष्मीकुबेर पूजन कधी आणि कसं करावं? दाते पंचांगाने दिली सविस्तर माहिती!
13
५ वर्षांनी 'आई कुठे...' मालिका संपणार! मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले- "ठाण्यातील ज्या बंगल्यात शूट केलं तिथे..."
14
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
15
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
16
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
17
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
18
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
19
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
20
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल

मानवी वस्तीलगत वीटभट्टय़ा नसल्याचा अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 2:21 AM

अकोला: राष्ट्रीय, राज्य महामार्गांलगत वीटभट्टय़ांचा गराडा असताना बाळापूर शहरासह तालुक्यात एकही पारंपरिक वीटभट्टी नसल्याचा अहवाल तहसीलदारांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिला आहे, त्यामुळे कायद्यानुसार वीटभट्टय़ावर कारवाईची जबाबदारी असलेल्या प्रदूषण मंडळाला आता काय करावे,  हा प्रश्न निर्माण झाला आहे. पारंपरिक वीटभट्टय़ांच्या स्थापनेबाबतच्या नियमांमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून हवा (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियम १९८१ च्या कलम ५४ मध्ये सुधारणेची अधिसूचना सप्टेंबर २0१६ मध्ये प्रसिद्ध झाली. 

ठळक मुद्देबाळापूर तहसीलदारांची प्रदूषण नियंत्रण मंडळाला माहिती

सदानंद सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: राष्ट्रीय, राज्य महामार्गांलगत वीटभट्टय़ांचा गराडा असताना बाळापूर शहरासह तालुक्यात एकही पारंपरिक वीटभट्टी नसल्याचा अहवाल तहसीलदारांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिला आहे, त्यामुळे कायद्यानुसार वीटभट्टय़ावर कारवाईची जबाबदारी असलेल्या प्रदूषण मंडळाला आता काय करावे,  हा प्रश्न निर्माण झाला आहे.पारंपरिक वीटभट्टय़ांच्या स्थापनेबाबतच्या नियमांमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून हवा (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियम १९८१ च्या कलम ५४ मध्ये सुधारणेची अधिसूचना सप्टेंबर २0१६ मध्ये प्रसिद्ध झाली. त्याप्रमाणे राष्ट्रीय-राज्य महामार्गापासून दोनशे मीटर अंतरावर वीटभट्टीची जागा निश्‍चित झाली आहे, तर पारंपरिक वीटभट्टय़ा मानवी वस्तीपासून कमीत कमी दोनशे मीटरच्या पुढे असाव्या, असे बंधन आहे. या नियमाची अंमलबजावणी करण्याचे निर्देशही देण्यात आले; मात्र त्यानंतरही हवेची गुणवत्ता बिघडविणार्‍या वीटभट्टय़ांसंदर्भात कोणतीही कारवाई अद्याप प्रदूषण नियंत्रण मंडळाने सुरू केली नाही. त्यासाठी महसूल विभागाकडून सातत्याने केवळ माहिती मागविण्यात आली. ती देण्यास टाळाटाळ केल्यानंतर फेब्रुवारी २0१७ मध्ये जिल्हय़ात कागदोपत्री केवळ ४६ वीटभट्टय़ा असल्याचे दर्शवण्यात आले. त्यापैकी सहा ठिकाणी वीज केंद्रातील राखेपासून विटांची निर्मिती केली जाते. 

वीटभट्टय़ांसाठी बंधनकारक नियममानवी वसाहतीलगतच्या पर्यावरणातील हवेची गुणवत्ता राखण्यासाठी विटांचा आकार व एकावेळी निर्मितीच्या संख्येनुसार वीटभट्टीधारकांना प्रदूषण नियंत्रण मंडळाची संमती असल्याशिवाय वीटभट्टी सुरू करता येत नाही, असा नियम आहे. त्यामध्ये ९ : ४ : ६ इंच आकाराच्या २५ हजार आणि  ९ : ४ : ३ इंच आकाराच्या ५0 हजारांपेक्षा जास्त नगांची निर्मिती करणार्‍यांना राष्ट्रीय हवा गुणवत्ता मानके आणि कायद्यातील अटींचे पालन करणे बंधनकारक आहे. त्यापेक्षा कमी संख्येने विटांची निर्मिती करणार्‍यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संमतीची गरज नसली, तरी कायद्यातील अटी व शर्ती पाळणे बंधनकारक आहेत.

महामार्गालगत वीटभट्टय़ांची गर्दी कायद्यानुसार वीटभट्टय़ांना आता प्रदूषण नियंत्रण मंडळाची संमती घ्यावी लागणार आहे; मात्र सद्यस्थितीत अकोला जिल्हय़ातील अनेक गावे, महामार्गालगतच वीटभट्टय़ांची प्रचंड गर्दी आहे. त्यामध्ये बाळापूर, चोहोट्टा, हाता, अंदुरा, भौरद, मनात्री या ठिकाणी महामार्गालगतच वीटभट्टय़ा आहेत. त्यापैकी काहीच भट्टय़ांची माहिती महसूल विभागाकडे आहे. उर्वरित भट्टय़ा अनधिकृत असल्याचेच चित्र आहे. आता तर बाळापूर तहसीलदारांनी वीटभट्टय़ांची माहितीच निरंक दिली. त्यानुसार कारवाई कुणावर करावी, हा प्रश्न प्रदूषण नियंत्रण मंडळाला पडला आहे. 

आधीच्या माहितीत तफावत सुरुवातीला बाळापूर तहसीलदारांनी तालुक्यात १0 वीटभट्टय़ा असल्याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिली होती. आता निरंक देण्यात आली. त्याचवेळी मूर्तिजापूर-२३, अकोट-९, अकोला-२, बाश्रीटाकळी-१ अशीही माहिती देण्यात आली होती.