अकोला: गत दिड वषार्पासुन युवासेनेचे जिल्हा कार्यकारीणी अभावी जिल्ह्यातील कार्य ठप्प पडले होते. दरम्यान नविन जिल्हा कार्यकारिणी जाहीर केल्यानंतर संघटनेची बांधणी व विविध आंदोलनाचा आढावा घेणारा अहवाल बुधवार, १४ मार्च रोजी युवासेनेचे जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप पाटिल यांनी शिवसेना भवन मुंबई येथे युवा सेना प्रमुख तथा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्याकडे वरुण सरदेसाई व विस्तारक नित्यानंद त्रिपाठी यांच्या मार्फत सादर केला. आगामी प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेप्रमाणेच युवासेनेलाही कार्य करावे लागणार आहे. त्या अनुषंगाने युवासेनेचे प्रमुख तथा शिवसेनेचे नेते आदीत्य ठाकरे यांनी युवासेनेच्या सर्व जिल्हाप्रमुखांची शिवसेना भवन येथे बुधवारी बैठक आयोजीत केली होती.त्यांनी युवासेनेचे कार्य कसे असले पाहिजे,युवकांच्या बेरोजगाराीचा प्रश्न,विद्यार्थ्यांच्या विविध समस्या आदी विषयावर मार्गदर्शन केले. आगामी प्रत्येक निवडणुकीत युवासेनेने सक्रिय सहभागी असले पाहीजे त्यासाठी संघटनेची बांधणी आधिक मजबुत करून शिवसेनेच्या बरोबरीने कामाला लागा, असे आदेशही त्यांनी यावेळी दिले.युवासेनेच्या जिल्हाप्रमुख निवड झाल्यानतंर गत तीन महिण्यात युवासेनेने केलेली बांधणी आणि विविध प्रश्नासाठी छेडलेले आंदोलने याबाबतचा एक लेखी अहवाल विठ्ठल सरप पाटिल यांनी शिवसेना भवन येथे नेत्यांच्या उपस्थित सादर केला.या वेळी महाराष्ट्रातील सर्व युवा सेना जिल्हा प्रमुख उपस्थीत होते.
अकोल्यातील युवासेनेच्या कार्याचा अहवाल आदीत्य ठाकरे यांना सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 5:10 PM
अकोला:नविन जिल्हा कार्यकारिणी जाहीर केल्यानंतर संघटनेची बांधणी व विविध आंदोलनाचा आढावा घेणारा अहवाल बुधवार, १४ मार्च रोजी युवासेनेचे जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप पाटिल यांनी शिवसेना भवन मुंबई येथे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे सादर केला.
ठळक मुद्दे आगामी प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेप्रमाणेच युवासेनेलाही कार्य करावे लागणार आहे.युवासेनेचे प्रमुख तथा शिवसेनेचे नेते आदीत्य ठाकरे यांनी युवासेनेच्या सर्व जिल्हाप्रमुखांची शिवसेना भवन येथे बुधवारी बैठक आयोजीत केली होती. युवासेनेने केलेली बांधणी आणि विविध प्रश्नासाठी छेडलेले आंदोलने याबाबतचा एक लेखी अहवाल विठ्ठल सरप पाटिल यांनी नेत्यांच्या उपस्थित सादर केला.