ठळक मुद्दे एका क्लिकवर मिळणार कोविड चाचणी अहवाल संसर्गाचा फैलाव टाळण्यास होईल मदत
अकोला: ‘आरटीपीसीआर’ चाचणी केल्यानंतर नागरिकांना आता क्लाउड पॅथोलॉजी लॅबद्वारे चाचणी अहवालाचे रिपोर्टिंग केले जात आहे. या माध्यमातून चाचणी करणाऱ्या व्यक्तीला थेट मोबाइल क्रमांकावर संदेश पाठविण्यात येत असून एका क्लिकवर नागरिकांना आपला चाचणी अहवाल पाहता येत आहे. त्यामुळे कोविडचा फैलाव टाळण्यास मोठी मदत होणार आहे. कोविडच्या दुसऱ्या लाटेदरम्यान आरटीपीसीआर चाचणीचे प्रमाण वाढले होते. त्याचा ताण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील व्हीआरडीएल लॅबवर आला होता. आलेले अहवाल लॅबद्वारे स्वॅब संकलन केंद्रांना पाठविले जात होते; मात्र त्यानंतरची अहवालासाठी सर्वोपचार रुग्णालयातच गर्दी होत होती. ही गर्दी टाळण्यासाठी तसेच कोरोनाचा फैलाव टाळण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातर्फे ‘क्लाउड पॅथोलॉजी लॅब’ची मदत घेतली जात आहे. या प्रणाली अंतर्गत आरटीपीसीआर चाचण्यांचे रिपोर्टिंग केली जात आहे. त्यामुळे आरटीपीसीआर चाचणीसाठी स्वॅब देणाऱ्या प्रत्येकाला आता एका क्लिकवर त्याचा वैद्यकीय चाचणी अहवाल पाहणे शक्य झाले आहे. त्यामुळे अहवालासाठी नागरिकांची होणारी दगदग, तसेच सर्वोपचार रुग्णालयात होणारी गर्दी टाळणे शक्य झाले आहे.क्युआर कोड अनिवार्यक्लाउड पॅथोलॉजी लॅबद्वारे प्राप्त आरटीपीसीआर चाचणी अहवालामध्ये क्युआर कोड अनिवार्य करण्यात आला आहे. त्याचा उपयोग परदेशी जाण्यासाठी विमानसेवेचा लाभ घेणाऱ्या नागरिकांना होणार आहे.ही काळजी आवश्यकक्लाउड पॅथोलॉजी लॅबद्वारे प्राप्त आरटीपीसीआर अहवालामध्ये चुकी झाल्यास त्यामध्ये दुरुस्त करणे शक्य नाही.त्यामुळे स्वॅब संकलन केंद्रावर माहिती देताना ती अचूक देणे गरजेचे आहे.आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक आणि रहिवासी पत्ता ही माहिती योग्य नोंदविली की नाही, याची खातरजमा करणेही गरजेचे आहे.नागरिकांना आरटीपीसीआर चाचणी अहवाल मिळण्यास सोईचे जावे, या अनुषंगाने क्लाउड पॅथोलॉजी लॅबद्वारे नागरिकांना मोबाइल क्रमांकावर संदेश पाठविला जातो. त्यामुळे नागरिकांना चाचणी अहवालासाठी गर्दीच्या ठिकाणी जाण्याची गरज नाही. घरी बसूनच अहवाल पॉझिटिव्ह की, निगेटिव्ह याची माहिती मिळणे शक्य झाले आहे.- डॉ. नितीन अंभोरे, विभाग प्रमुख, व्हीआरडीएल, जीएमसी, अकोलाक्लाउड पॅथोलॉजी लॅबद्वारे ‘आरटीपीसीआर’चे रिपोर्टिंग!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 9:46 AM