अकोला : तरुणवर्ग संशोधनाच्या क्षेत्रात आघाडीवर आहे. राष्ट्रीय स्तरावर होणाºया परिषदांमध्ये तरुण संशोधकांच्या संशोधनाला प्रोत्साहन मिळते, तसेच त्यांच्या संशोधनाला दिशा देण्याचे काम राष्ट्रीय परिषदेत सहभागी तज्ज्ञांकडून केल्या जाते. देशामध्ये नवनवीन विषयात संशोधन करण्यासाठी तरुणांनी पुढे आले पाहिजे, असे मत शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीवन सभासद डॉ. ई.व्ही. उपाध्ये यांनी केले.शिवाजी महाविद्यालयात सोमवारी सुरू झालेल्या राष्ट्रीय परिषदेच्या समारोपाप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून गुजरात विद्यापीठाचे डॉ. किशोर चिखालिया, बडोदा विद्यापीठाचे डॉ. पी.टी. देवता, रिलायन्स उद्योग समूहाच्या संशोधन विभागाचे डॉ. पी.ए. गणेशपुरे, प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे, उपप्राचार्य डॉ. एस.पी. देशमुख, डॉ. आशिष राऊत, डॉ. गजानन कोरपे उपस्थित होते. राष्ट्रीय परिषदेमध्ये सहभागी संशोधकऋचा पुरंदये,डॉ. हेमंत चांडक, डॉ. शिवांकर ठाकूर यांनी अभिप्राय मांडला. तसेच केशवराव मेतकर, डॉ. अरविंद नातू, डॉ. कल्लोलकुमार घोष, डॉ. अनिल कर्णिक, डॉ. झाडे, डॉ. एम. मुथुकृष्णन, डॉ. पी.टी. देवता, डॉ. किशोर चिखालिया यांनी मार्गदर्शन केले. परिषदेमध्ये घेण्यात आलेल्या पोस्टर स्पर्धेत अमरावतीच्या रूपाली जाधव यांनी प्रथम क्रमांक पटकावला. अमरावतीचे पी.ए. लाडोणे यांनी द्वितीय, तृतीय क्रमांक नागपूरची पूजा भुरे, नांंदेडची अपर्णा कदम यांनी पटकावला. परीक्षक म्हणून डॉ. गणेशपुरे, डॉ. मराठे, डॉ. बी.एन. बेराड होते. कार्यक्रमामध्ये डॉ. एस.पी. देशमुख यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त त्यांच्या विद्यार्थ्यांसह प्रा. पी.एस. पाटील, प्रा. सुशीर त्यांचा सपत्नीक सत्कार केला. संचालन प्रा. अंजली देशमुख यांनी केले.