- रवी दामोदर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : इयत्ता अकरावीला महाविद्यालयातील प्रवेशासाठी स्पोर्ट्स कोट्यातून मिळणारे आरक्षण जिल्हा, विभाग, राज्य स्तरावर पदक व राष्ट्रीय स्तरावर स्पर्धांमध्ये सहभागी खेळाडूंसाठी बंद झाल्याने शेकडो खेळाडू स्पोर्ट्स कोट्यातून प्रवेशापासून वंचित राहत आहेत. स्पोटर््स कोट्यातून आरक्षण केवळ आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी, राष्ट्रीय स्तरावर पदक विजेते खेळाडूंनाच उपलब्ध असणार आहे.शालेय स्तरावर इयत्ता ८ वी, ९ वी व १० वी या वर्गातील विद्यार्थी क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी खेळाडूंना प्रत्येक महाविद्यालयात ३ टक्के स्पोटर््स कोटा राखीव ठेवला जातो. या विद्यार्थ्यांना स्पोर्ट््स कोट्यातून प्रवेश दिला जातो.दोन वर्षांपूर्वी शासनाने शालेय राष्ट्रीय स्पर्धेत पदक मिळविलेल्या व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंना ३ टक्के स्पोटर््स कोट्यातून प्रवेश मिळत आहे; मात्र जिल्हा, विभाग, राज्य स्तरावर पदक विजेत्या व राष्ट्रीय स्पर्धेत खेळाडूंना यापासून वंचित राहावे लागत आहे.अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू होताच खेळाडूंची जिल्हा क्रीडा कार्यालयात अकरावी प्रवेशासाठी स्पोर्ट््स कोट्यातून पात्र असणारे पत्र घेऊन जाण्यासाठी लगबग असायची; मात्र हे चित्र बदलले आहे. इयत्ता अकरावी प्रवेशाकरिता दि. २० डिसेंबर, २०१८ च्या शासन निर्णयानुसार, खेळाडूंकरिता निश्चित करण्यात आलेला कोटा केवळ आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होणारे खेळाडू विद्यार्थी व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमधील पदक विजेते खेळाडू यांच्याकरिताच उपलब्ध आहे. त्यामुळे अन्य जिल्हा, विभाग, राज्य स्तरावर पदक व राष्ट्रीय स्तरावर स्पर्धांमध्ये सहभागी असणारे खेळाडू प्रवेशापासून वंचित राहत आहेत.
या निर्णयामुळे ग्रामीण भागातील खेळाडू विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीय स्तरावर सहभागी खेळाडूंनाही या स्पोर्ट््स कोट्याचा लाभ मिळायला हवा.-प्रभजित सिंह बछेर, माजी महासचिव तथाउपाध्यक्ष आॅल इंडिया कॅरम फेडरेशन, दिल्ली.