लोकमत न्यूज नेटवर्कमहान : यावर्षी अत्यल्प झालेल्या पावसामुळे महान धरणाने तळ गाठलेला आहे. गेल्या दोन दिवसांपासून धरणाच्या परिसरात चांगला पाऊस झाल्याने जलसाठय़ात १७ सेंमीने वाढ झाली आहे. धरणाचा जलसाठा २0 टक्क्यांवर पोहोचला आहे. पावसाळा संपत आला, तरी धरणामध्ये केवळ १५ टक्के जलसाठा होता. रिपरिप पावसाने फेट्रा, धानोरा, देवदरी या जवळपासच्या परिसरातील पाणी महान धरणात जमा झाले असून, मुख्य काटा कोंडाळा नदीचे पाणी अद्यापही महान धरणात आलेले नाही. ८ व ९ ऑक्टोबर रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे आज १0 ऑक्टोबर रोजी महान धरणाच्या जलसाठय़ात एकूण १७ सें. मी. ने वाढ झाल्याची नोंद करण्यात आली आहे. ९ ऑक्टोबर रोजी महान धरणाची पाणी पातळी ३४0.८१ मीटर, १६.६८८ द.ल.घ.मी. व १९.३२ टक्के अशी होती तर १0 ऑक्टोबर रोजी ३४0.९८ मीटर, १७.८११ द.ल.घ.मी. व २0.६२ टक्के अशी असून, एकूण १७ सें. मी. ने वाढ झाली आहे. धरण परिसरात ४0 मी. मी. पावसाची नोंद झाली आहे. महान धरणात वाढलेला जलसाठा हा मुख्य नदीचा नसून, जवळपासच्या परिसरातला असल्याचे सूत्राने सांगितले. धरणातील जलसाठय़ाकडे शाखा अभियंता सय्यद, जानोरकार, पाठक, पिंपळकर, हातोलकर, शिराळे, खरात, अकबर शहा, अजीज हे लक्ष ठेवून व्यवस्थित नियोजन करीत आहेत.
महान धरणातील जलसाठा २0.६२ टक्क्यांवर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 1:41 AM
लोकमत न्यूज नेटवर्कमहान : यावर्षी अत्यल्प झालेल्या पावसामुळे महान धरणाने तळ गाठलेला आहे. गेल्या दोन दिवसांपासून धरणाच्या परिसरात चांगला पाऊस झाल्याने जलसाठय़ात १७ सेंमीने वाढ झाली आहे. धरणाचा जलसाठा २0 टक्क्यांवर पोहोचला आहे. पावसाळा संपत आला, तरी धरणामध्ये केवळ १५ टक्के जलसाठा होता. रिपरिप पावसाने फेट्रा, धानोरा, देवदरी या जवळपासच्या परिसरातील ...
ठळक मुद्देयावर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे महान धरणाने गाठला तळ