नाथनगर व जिजामाता नगर या परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक अनेक दशकांपासून राहात आहेत. मात्र, शासन दरबारी हा भाग आरक्षण म्हणून दाखविला जात असल्याने या परिसरातील जनतेला घरकुलाचा लाभ मिळत नाही. ही मालमत्ता असूनही त्याची नोंद होत नसल्याने त्यावर बँक कर्ज किंवा गहाण खत, खरेदी खत नोंदीसाठी अडचणी येत आहेत. हा प्रकार गेल्या २०१०पासून सुरू असल्याने अचानक कायद्यामध्ये बदल कसा झाला, असा प्रश्न विचारला जात आहे. यापूर्वी अनेकदा नगर परिषदेला निवेदन देऊनही प्रश्न सुटला नाही, तरी याकडे संबंधित मंत्री व जिल्हाधिकारी यांनी तातडीने लक्ष घालून मुद्दा मार्गी लावावा, १५ दिवसांत प्रश्न निकाली न निघाल्यास उपोषण करण्यात येईल, असा इशारा येथील रहिवासी शिवसेना उपतालुका उपप्रमुख गावंडे व काकड यांनी निवेदनाव्दारे प्रशासनाला दिला आहे.
आरक्षणाचा मुद्दा सोडवा; अन्यथा उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 4:23 AM