जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार सकाळी ११ वाजेपर्यंत परवानगी असलेली दुकान उघडण्याची वेळ ठरली आहे. त्यामुळे सकाळी दिसणारी लगबग ११ वाजतानंतर दिसत नाही. परंतु शहरात रस्त्यांवर नागरिक व लघु व्यवसायिक अद्यापही बेफिकीर दिसत आहेत. अनेक जण विना मास्क फिरत आहेत. दुकानांमध्ये सॅनिटायझर नाही. केवळ खरेदी-विक्रीची झुंबड दिसते. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात फळविक्रेत्यांची बेफिकिरी ग्राहकांच्या जीवावर बेतणारी आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दंडात्मक कारवाई करणाऱ्या प्रशासनाचा धाक संपला की काय, अशी परिस्थिती आहे. विशेष म्हणजे ग्राहकांची गर्दी कमी झाली आहे. संपूर्ण बाजारपेठेमध्ये शुकशुकाट दिसून येत असून, रस्ते ओस पडले आहेत. शहरातील जवाहर मार्ग, जयस्तंभ चौक, अकोला रोड, शिवाजी चौक, सोनू चौक, हिवरखेड रोड, बस स्टँड रोड, नरसिंग रोड, यात्रा चौक, शौकतअली चौक, मोठे बारगण हा परिसर नेहमी गर्दीने गजबजलेला असतो. परंतु मंगळवारी मात्र या परिसरात शुकशुकाट दिसून आला.
फोटो: