जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, फेब्रुवारी महिन्यात बाळापूर शहरात ५, तर ग्रामीण भागात ५५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये नगर परिषदेचे तीन अभियंते, ग्राम पंचायतीच्या सरपंच, उपसरपंच निवडणुकीसाठी गेलेले निवडणूक अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कोरोनाबाधिताची रुग्णसंख्या वाढत असताना प्रशासनाने रविवारी संचारबंदीचे आदेश दिले होते. या संचारबंदीला शहरासह तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, व्यापाऱ्यांनी स्वत:हून दुकाने बंद ठेवली. तालुका प्रशासनाने कोरोना तपासणी वाढविण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांनी बैठकीत दिले. रविवारी संचारबंदीत तहसीलदार डी. एल. मुकुंदे, न. प. मुख्याधिकारी जी.एस. पवार, ठाणेदार दतात्रय आव्हाळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भावना हाडोळे यांनी कोरोनाविषयक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले होते. याला साद देत व्यावसायिकांनी
शहरात बंद पाडला बाळापूर पोलिसांनीसुद्धा कडक अंमलबजावणी केली. (फोटो)