कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जीवनावश्यक वस्तूची दुकाने वगळता इतर सर्वच व्यवसाय सुरू ठेवण्यास मनाई केली आहे. त्यामुळे केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. दुकाने सकाळी ९ ते संध्याकाळी ८ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आली होती. मात्र, याच संधीचा फायदा घेत काही नागरिक विनाकारण रस्त्यांवर गर्दी करीत असल्याचे दिसून येत होते. अखेर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते ११ वाजतापर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली. त्यामुळे शहरातील सर्व बाजारपेठा ११ वाजेनंतर बंद असल्याचे दिसून आले. तसेच शहरात संपूर्ण शुकशुकाट दिसून आला. तेल्हारा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी पोलीस ताफ्यासह नागरिकांना कोरोना प्रतिबंध नियमावलीचे पालन करण्याचे आवाहन केले.
तेल्हारा शहरात ‘लॉकडाऊन’ला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 4:18 AM